VIDEO: दिल्ली विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, CISF जवानाने CPR देऊन वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

श्रीनगरला विमानाने जाणारा अर्शीद अयुब अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला.

Photo Credit: X

New Delhi: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर मंगळवारी (20 ऑगस्ट) सकाळी एका प्रवाशाचा जीव CISF वाचल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीनगरला विमानाने जाणारा अर्शीद अयुब अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. यावेळी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या क्विक रिस्पॉन्स टीमने त्वरित CPR (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) देऊन त्यांची प्रकृती स्थिर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.CISF अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अर्शिद अयुब अचानक बेशुद्ध झाला तेव्हा क्विक रिस्पॉन्स टीमने वेळ न घालवता CPR चा वापर केला, ज्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.हेही वाचा: Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ, पाठिमागील वर्षाच्या तुलनेत 2024 च्या पहिल्या तिमाहीत संख्या 7% नी वाढली

 

आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी त्वरित आणि योग्य प्रतिसाद किती महत्त्वाचा असू शकतो हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध होते. CISF क्विक रिस्पॉन्स टीमची तत्परता आणि त्यांनी पुरवलेली तत्काळ वैद्यकीय मदत यामुळे अर्शिद अयुबचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या घटनेनंतर सीआयएसएफने एक निवेदन जारी करून सांगितले की, त्यांची टीम सदैव तयार आहे जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवता येतील. सीपीआरचे महत्त्व सांगून ते म्हणाले की, ते जाणून घेणे आणि त्याचा योग्य वेळी वापर करणे जगण्यासाठी आवश्यक आहे.

या घटनेनंतर अर्शीद अयुबच्या कुटुंबीयांनी सीआयएसएफचे आभार व्यक्त करत ही मदत वेळेवर मिळाली नसती तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.