पानीपुरी चे ATM मशीन की वेंडिंग मशीन; सोशल मिडियावर व्हायरल होतोय ही भन्नाट कल्पना सत्यात उतरवणारा 'हा' व्हिडिओ, नक्की पाहा
सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी हा एक अजब फंडा समोर आला आहे.
Panipuri Vending Machine or Pani Puri ATM: आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञान कधी काय चमत्कार घडवेल याचा काही नेम नाही. 'पानीपुरी' तमाम देशवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असताना त्यावर एक भन्नाट कल्पना या लॉकडाऊनच्या दरम्यान सुचली. ही कल्पना म्हणजे पानीपुरीचे (Panipuri) एटीएम बनविण्याची. ऐकून धक्का बसला ना! पण हे खरे आहे. ही कल्पना सत्यात उतरविणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून याला पानीपूरीचे वेंडिंग मशीन बोलावे की पानीपुरीचे एटीएम तेच अनेकांना सूचत नाही आहे.
पानीपुरीवाल्याच्या हाताने बनवलेली जी पानीपुरी आजवर आपण खाल्ली ती पानीपुरी आता डायरेक्ट मशीन मधून बनून येणार आहे. सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी हा एक अजब फंडा समोर आला आहे. दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबिल ने वडिलांच्या आठवणीत शेअर केला त्याचा पानीपुरी खातानाचा व्हिडिओ
पानीपुरी ही अनेकदा ती बनविण्याच्या प्रकारामुळे अस्वच्छ मानली जाते. अशातच सध्या देशावर महामारीचे आलेले संकट पाहता पानीपुरीवर अनेकांना ताव मारता येणार नाही आहे. अशा वेळी मशीन द्वारा बनविलेल्या या सोशल डिस्ंटसिंगचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.
सर्वसामान्यपणे पानीपुरी बनविताना पानीपुरीवाले ती पुरी बोटांनी मधोमध फोडायचे. त्यानंतर त्यात बूंदी, रगडा, गोड पाणी आणि पानीपुरीचे पाणी टाकले जायचे. मात्र या मशीन द्वारे हे काहीच करायची गरज नाही. या मशीनमधून डायरेक्ट तयार झालेली पानीपुरी तुमच्यासमोर येणार आहे.
भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. 20,903 नवे रुग्ण आढळले असून 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर पोहचला आहे.