दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबिल ने वडिलांच्या आठवणीत शेअर केला त्याचा पानीपुरी खातानाचा व्हिडिओ
या व्हिडिओखाली 'जेव्हा तुम्ही खूप काळापासून डाएटवर असायचात आणि शूटिंग संपल्यावर मनसोक्त पानीपुरी खायचा' असे म्हटले आहे.
बॉलिवूडचा हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर भारतात परतलेल्या इरफानचे असे अचानक जाणे मनाला चटका लावणारे होते. त्याच्यासोबत अनेक आठवणी त्याचे कुटूंब आणि त्याचा मित्र परिवार सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे. नुकताच त्याच्या मुलाने बाबिल ने इरफानचा पानीपुरी खातानाचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन बाबिलने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या व्हिडिओखाली 'जेव्हा तुम्ही खूप काळापासून डाएटवर असायचात आणि शूटिंग संपल्यावर मनसोक्त पानीपुरी खायचा' असे म्हटले आहे. Neuroendocrine Tumor: इरफान खान यांच्या मृत्यूचे कारण ठरला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर! जाणून घ्या हा आजार कसा होतो, त्याचे लक्षण आणि उपचार
View this post on Instagram
When you’re on diet for so long and then the shoot ends and you can have pani puri.
बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irfan Khan) याचे 29 एप्रिलला वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 28 एप्रिल रोजी काहीश्या प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, मागील दोन वर्षांपासून इरफान खान हे न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर (Neuroendocrine Tumor) या गंभीर आजाराशी लढा देत होते.
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2020 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

