Hareem Shah Video Leak Controversy: पाकिस्तानी टिकटॉक स्टार हरीम शाहचा बाथरूम व्हिडिओ लीक; मित्रांवर केला आरोप
हरीमने सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांनी हे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तेव्हा खट्टक आणि नाज तिच्यासोबत राहत होते. 31 वर्षीय टिकटोक स्टारने सांगितले की, व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच दोघांनी तिला व्हिडिओ लीक करण्याची धमकी देखील दिली होती.
Hareem Shah Video Leak Controversy: पाकिस्तानी टिकटॉक स्टार हरीम शाहचा (TikTok star Hareem Shah) बाथरूम व्हिडिओ लीक (Bathroom Video Leak) झाला आहे. हा व्हिडिओ जवळच्या मैत्रिणी चंदन खट्टक आणि आयेशा नाझ यांनी लीक केल्याचा आरोप हरीमने केला आहे. हरीम शाह यांचे व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. तथापि, टिकटोक स्टारने बुधवारी स्पष्ट केले की, क्लिप खट्टक आणि नाझ यांनी लीक केल्या. एका खाजगी मोरक्कन टीव्ही चॅनेलशी बोलताना शाह यांनी कबूल केले की, व्हिडिओ अस्सल आणि वैयक्तिक आहेत.
व्हिडिओंमध्ये, शाह अंघोळ करताना आणि एका अज्ञात व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करताना दिसली. सोशल मीडिया स्टारने तिच्या मैत्रिणी चंदन खट्टक आणि आयशा नाजवर तिचे खाजगी व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला आहे. हरीमने सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांनी हे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तेव्हा खट्टक आणि नाज तिच्यासोबत राहत होते. 31 वर्षीय टिकटोक स्टारने सांगितले की, व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच दोघांनी तिला व्हिडिओ लीक करण्याची धमकी देखील दिली होती. (हेही वाचा - पाकिस्तानी कुकरी शो 'The Kitchen Master' मधील महिलेची अफलातून ऑडिशन क्लिप वायरल; परीक्षकांनी लावले कपाळाला हात (Watch Video))
या दोघांना माझ्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करायच्या होत्या, असेही तीने सांगितले. हरीमचे पती बिलाल शाह यांनी द न्यूजला सांगितले की, हे व्हिडिओ व्हायरल होण्याच्या एक वर्ष आधी तिने FIA कडे तक्रार केली होती. पण FIA ने तिला कंटेंट सार्वजनिक होईपर्यंत थांबायला सांगितले. एफआयएवर संताप व्यक्त करत बिलाल म्हणाले की, मी हरीमच्या पाठीशी उभा आहे आणि लवकरच कायदेशीर कारवाई करू.
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2023 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

