Orkut Funny Memes & Jokes: ऑर्कुट वरील फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल; पहा तुम्ही रिलेट करताय का?

पण 90 च्या दशकातील मुलांनी ऑरकूटचा अभुवनही घेतला आहे. Orkut ट्विटरवर ट्रेंड होतंय. त्यामुळे त्यावर फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. या मीम्स आणि जोक्सशी तुम्हीही रिलेट करु शकाल.

Orkut Memes (Photo Credits: Twitter)

आजकाल फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), स्नॅपचॅट (Snapchat), ट्विटर (Twitter), टेलिग्रॉम (Telegram) यांसारखे सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म्स सर्रास वापरले जातात. पण 90 च्या दशकातील मुलांनी ऑरकूटचा अभुवनही घेतला आहे. तुमच्यापैकी कितीजणांना ऑरकूट माहित आहे? तुम्ही ते वापरलं? आणि त्याच्या काही आठवणी तुमच्यापाशी आहेत? ते काहीही असले तरी सध्या #Orkut ट्विटरवर ट्रेंड होतंय. त्यामुळे त्यावर फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. या मीम्स आणि जोक्सशी तुम्हीही रिलेट करु शकाल. (First Salary Funny Memes: सोशल मीडियात नेटिझन्सचा पहिली कमाई आणि त्याचा सोर्स शेअर करण्यावरून धम्माल मिम्स, जोक्स वायरल!)

सध्याच्या पीढीला कदाचित Orkut विषयी ठाऊक नसेल, ते कसे वापरायचे, एन्जॉय करायचे याची कल्पना नसेल. परंतु, 90 च्या दशकातील अनेक मुलांनी ऑर्कुट अकाऊंट ओपन करण्यासाठी त्यांचा पहिला ईमेल आयडी सुरु केला. ऑर्कुट जॉईन करण्यासाठी invite पाठवावे लागत असे. तसंच पूर्वी इंटरनेट फ्री किंवा स्वस्त नसल्याने युजर्संना पैसे देऊन अॅक्सेस मिळवावा लागत असे. त्यामुळे प्रत्येक मेसेजची, चॅटची किंमत मोजावी लागत असे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आता सोशल नेटवर्किंग साईट्सचा भडिमार पाहायला मिळतो. त्यामुळे मेसेज, चॅट करणे, कनेक्टेड राहणे अगदी सोपे आहे.

Orkut Funny Memes & Jokes:

दरम्यान, सध्या ऑर्कुट वरील फनी मीम्स, जोक्स जोरदार व्हायरल होत आहेत. हे पाहुन काहींच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. आणि तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसह हे जोक्स, मीम्स शेअर करु शकाल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif