Nora Fatehi Hot Booti Dance: नोरा फतेही चा समुद्र किना-यावरील हॉट बूटी डान्स सोशल मिडियावर व्हायरल, मिळाले 31 लाखांहून अधिक व्ह्यूज, Watch Video
Nora Fatehi Booti Dance (Photo Credits: Instagram)

दिलबर दिलबर, कमरियां, हाय गर्मी यांसारख्या गाण्यांनी अनेक तरुणांवर मोहिनी घालणारी हॉट अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचे मनमोहक सौंदर्य आणि अफलातून डान्स स्टाईल ही तिची खरी ओळख आहे. काही दिवसांसासाठी ती 'इंडियाज बेस्ट डान्सर' (India's Best Dancer) या कार्यक्रमात अभिनेत्री मलायका अरोराच्या जागी परीक्षक म्हणून पाहुणी परीक्षक म्हणून आली होती. तिच्या येण्याने तिने आपल्या जबरदस्त डान्स स्टाईलने या शो मध्ये जान आणली होती. त्यानंतर अलीकडेच या शो मध्ये मलायका अरोरा परत आली असून नोराने या शो ला अलविदा केले आहे. त्यानंतर ती सुट्टीसाठी कुठे तरी बाहेर गेल्याचे सूत्रांनी सांगितले होते. त्यातच तिचा आता एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत ती एक समुद्रकिनारी एक जबरस्त बूटी डान्स (Booti Dance) करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत तिचा एक मित्र देखील आहे. जो तिच्यासोबत हा अफलातून डान्स करत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओला 31 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. Nora Fatehi Hot Dance: नोरा फतेही चा हा हॉट डान्स पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम, Watch Video

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Aaaayyyy issa vibe 🔥 🔥 #livingmybestlife @marcepedrozo 😄😄

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

या पोस्टखाली 'मी माझे सर्वात चांगले जीवन जगत आहे' असे तिने म्हटले आहे. नोराच्या या हॉट अदा आणि ग्लॅमरस अंदाज पाहण्यासाठी अनेक जण तिला इन्स्टाला फॉलो करतात. नोरा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर 13.5 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.