Navneet Kaur Rana Viral Video: नवनीत राणा लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर झाल्या भावूक? सोशल मीडीयात 'त्या' वायरल व्हिडिओ मागील सत्य काय
त्यावेळचा हा जुना व्हिडिओ आता पुन्हा वायरल होत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला तगडी टक्कर दिली आहे. यामध्ये अनेक मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदा पहिल्यांदाच भाजपाच्या चिन्हावर लढलेल्या नवनीत राणा (Navneet Kaur Rana Viral Video) देखील लोकसभा निवडणूक हरल्या आहेत. त्यांच्या पराभवानंतर सोशल मीडीयात एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. रडवेल्या नवनीत यांना त्यांचे पती आणि आमदार रवी राणा धीर देताना दिसत आहे. सध्या अनेकांकडून हा व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान अनेकांना हा व्हिडिओ कालच्या पराभवानंतरचा असल्याचं वाटत असेल पण प्रत्यक्षात त्यांचा हा जुना व्हिडिओ आता वायरल होत आहे.
2019 मध्ये नवनीत राणा एनसीपी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून लोकसभेमध्ये निवडून आल्या. नंतर त्यांची भाजपासोबत जवळीक वाढली आणि यंदा त्या भाजपाच्या चिन्हावर निवडणूकीला सामोरे गेल्या पण मतदारांनी त्यांना नाकारले आहे. या निकालानंतर नवनीत राणा- रवी राणा यांचा व्हिडिओ वायरल होत आहे पण तो जूना व्हिडिओ आहे. Navneet Rana: 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची भेट, नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर .
नवनीत राणांचा जुना व्हीडिओ वायरल
उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर एप्रिल 2022 मध्ये हनुमान चालिसा पठणाच्या वादावरून रवी राणा- नवनीत राणा यांना तुरूंगवास झाला होता. 14 दिवसांच्या तुरूंगवारी नंतर नवनीत राणा थेट हॉस्पिटल मध्ये दाखल होत्या. त्यावेळचा हा जुना व्हिडिओ आता पुन्हा वायरल होत आहे.