NASA ने शेअर केला Mars वरील पहिला सेल्फी, फोटो पाहिलात का?
त्यात अजून एका नव्या संशोधनाची भर पडली आहे.
NASA दिवसेंदिवस त्यांच्या संशोधनातून नव नवीन प्रयोग करण्याच्या मागे असते. त्यात अजून एका नव्या संशोधनाची भर पडली आहे. दुनियेतील ज्या ग्रहाबद्दल लोकांना माहिती करुन घ्यायचे होते अशा मंगळ ग्रहावरील (Mars planet) सेल्फी फोटो नासा कंपनीने सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.
नासा इनसाइट (NASA In Sight) यांनी ट्विटरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील एक सेल्फी फोटो नुकताच सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर फोटोला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून नेटकऱ्यांना मंगळ ग्रहावरील रोबोट (Robot) पाहायला मिळाला आहे. या रोबोटला दोन हात असून त्याच्या बाजूला कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत. तर नासाने या मंगळ ग्रहावरील रोबोटचे विविध बाजूने फोटोसुद्धा काढले आहेत. या फोटोला 'पहिला सेल्फी! मी मंगळावर स्वस्थ आणि उत्साहित समजतो.' असे कॅप्शन ही देण्यात आले आहे. (हेही वाचा- Geminid Meteor Shower 2018: आकाशात आज होणार उल्का वर्षाव, गुगलचे खास डुडल)
या मंगळ ग्रहाचा फोटो अवघ्या काही वेळातच सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोबद्दल आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून त्यांनी मंगळावरील हा फोटो पाहायला मिळाल्याचा आनंद ही व्यक्त केला आहे.