महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांनी रूळावर पडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी लोकल समोर उडी मारत बजावलं कर्तव्य; पहा ग्रॅन्ट रोड स्थानकातील हा प्रसंग
त्याला वाचवण्यासाठी रेल्वे स्थानकात ऑन ड्युटी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे (Lata Bansode) यांनी जीवावर उदार होऊन मदत केली
पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅन्ट रोड स्टेशनमध्ये (Grant Road Railway Station) एक व्यक्ती चक्कर येऊन रूळावर पडला. त्याला वाचवण्यासाठी रेल्वे स्थानकात ऑन ड्युटी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे (Lata Bansode) यांनी जीवावर उदार होऊन मदत केली. स्थानकात लोकल येत असूनही त्यांनी रूळावर उडी मारत जीवावर उदार होऊन आपलं कर्तव्य बजावलं आहे. दरम्यान काही प्रवाशांनी देखील लता बनसोडे यांना मदत केली. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे.
दरम्यान ग्रॅन्ट रोड स्टेशनवरील ही घटना शनिवार 26 डिसेंबर दिवशीची आहे. हा प्रकार पुढे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील लता बनसोडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ट्वीट करत त्यांनी व्हिडिओ शेअर करताना, 'बनसोडे यांनी दाखविलेले हे साहस व कार्यतत्परता कौतुकास्पद आहे. तसेच मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार' असे देखील म्हटलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्वीट
मीडीया रिपोर्ट्स नुसार, ग्रॅन्ट रोड स्थानकात प्लॅटफार्म नंबर 1 वरून जात असताना ईरानी कैजाद नावाच्या व्यक्तीला अचानक चक्कर आली. तोल सावरता न आल्याने तो थेट रेल्वेच्या रुळावर कोसळला. हा प्रकार महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे आणि रेल्वे सुरक्षा जवान कैलाश चंद्र यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने रूळाकडे धाव घेतली. समोरून येणारी लोकल देखील अवघ्या काही मीटरच्या अंतरावर थांबली आणि मोठा अनर्थ टळला.