मुंबई पोलिसांनी Robert Pattinson चा बॅटमॅन लूक वापरत COVID-19 मध्ये मास्क कसा वापरू नये याची दिली माहिती (View Pic)
यामध्ये आज बॅटमॅनचा लूक वापरण्यात आला आहे.
सध्या कोरोना व्हायरस संकटाशी झुंजणार्या मुंबकरांना चेहर्यावर फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. मुंबईकरांनीही त्याची आता सवय करून घेतली आहे. दरम्यान कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर प्रत्येकाने फेस मास्क घालणं अत्यावश्यक आहे. यामुळे श्वसननलिकेच्या माध्यमातून कोरोना व्हायरस थेट शरीरात जाऊन धोका वाढवण्याची स्थिती नियंत्रणात ठेवू शकतो. हाताच्या संपर्कातून कोरोना व्हायरस डोळे, तोंड, नाकातून शरीरात जातो. पण मास्क चेहर्यावर असेल तर सहाजिकच वारंवार चेहर्याला हात लावण्याची सवय कमी होते. कोरोना व्हायरस संकटापूर्वी आपल्याला सुपर हिरो मास्क घालत असलेले ठाऊक होते.
मुंबई पोलिसांनी ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबत समाज प्रबोधनाचे काम केले जात आहे. सध्या लोकांच्या, तरूणाईच्या जिव्हाळ्याच्या विषयाने मास्क बाबत जनजागृती केली जात आहे. आज मास्कच्या वापराबाबत Batman म्हणजे Robert Pattinson चा फोटो वापरून केला आहे. बॅटमॅनचा मास्क केवळ डोळे झाकत होते. तर नाक, तोंड उघडे असतात. पण हे "How not to wear a mask! #BATforsafetyMAN." असं ट्वीट करत त्यांनी मुंबईकरांना दक्ष केले आहे.
मुंबई पोलिस ट्वीट
मुंबई पोलिस यांनी काही दिवसांपूर्वी पाताललोक सीरीजचा वापर करूनही कोव्हिड 19 बद्दल सजग करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई शहरामध्ये देशातील सर्वाधिक रूग्ण असल्याने भीती वाढत आहे.