मुंबई पोलिसांनी अभिनेता Pankaj Tripathi च्या मान वळवण्याच्या लकबीच्या मिम्सचा वापर करत नागरिकांना दिला महत्त्वाचा संदेश
सध्या अभिनेता पंकजत्रिपाठीच्या मान वळवण्याच्या लकबीचा आधार घेत एक ट्वीट करून Mumbai Police यांनी लोकांना ऑनलाईन लॉटरीत होणार्या फसवणूकीबद्दल सजग केले आहे.
मुंबई पोलिस (Mumbai Police) ट्वीटर अकाऊंट हे ताज्या घडामोडी, बॉलिवूड ते हॉलिवूड आणि अगदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ट्रेंड्स पाहून मार्मिक ट्वीट करून समाजात जनजागृतीचं काम करत असतात. सध्या अभिनेता पंकज त्रिपाठीच्या (Pankaj Tripathi) मान वळवण्याच्या लकबीचा आधार घेत एक ट्वीट करून त्यांनी लोकांना ऑनलाईन लॉटरीत होणार्या फसवणूकीबद्दल सजग केले आहे. अभिनंदन तुम्ही करोडपती झाले आहात. तुमचे अकाऊंट डिटेल्स शेअर करा असा मेसेज तुम्हांला आला तर जबाबदार नागरिक हा मेसेज करणार्या व्यक्तीला ब्लॉक करेल. 100 नंबर डाएल करून तो रिपोर्ट करेल. आणि आपण रजत प्रमाणे मान वळवून ते मान्य करून करू असे एक मजेशीत मिम्स शेअर करण्यात आले आहे. Mumbai Police: डोनाल्ड ट्रम्प, जो बिडेन आकडा बदलू शकतात पण, मुंबई पोलीस कधीच नाही सुरक्षेसाठी नेहमीच संपर्क करा 100 या क्रमांकावर.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रजत त्रिपाठीच्या मान वळवण्याच्या लकबीची खूप खर्चा आहे. त्यावरून अनेक मजेशीर ट्वीट, विनोदी मिम्स सोशल मीडियामध्ये शेअर झाले आहेत. आता त्यामध्ये मुंबई पोलिसांनी देखील उडी घेतली आहे.
मुंबई पोलिस ट्वीट
दरम्यान यापूर्वीदेखील मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या काळात मास्क घालण्यावरून 'बबड्या' या लोकप्रिय पात्राचा वापर करून नागरिकांना मेसेज दिला होता. तर फ्रेंड्स सारख्या सिटकॉममधील पात्रांचा वापर करून मुंबई पोलिस ट्वीटरवर आपले मेसेजेस हटके अंदाजात नागरिकांपर्यंत पोहचवत असतात.