Medicine Found in Food: मुंबईतील व्यक्तीला Swiggy वरून ऑर्डर केलेल्या जेवणात सापडली औषधाची गोळी, पहा फोटोज

यावर स्विगीने उत्तर दिले की, 'आम्हाला तुमचा डीएम मिळाला आहे, तिथे भेटू.' दुसर्‍या प्रत्युत्तरात, स्विगीच्या प्रतिनिधीने लिहिले आहे की, 'आम्ही आमच्या रेस्टॉरंट भागीदार उज्वल यांच्याकडून चांगल्या अपेक्षा करतो. आम्हाला थोडा वेळ द्या.'

Medicine Found in Food (PC -X/ @ompsyram)

Medicine Found in Food: मुंबईतील एका व्यक्तीला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला Swiggy वरून ऑर्डर केलेल्या जेवणात गोळी (Medicine) सापडली. या व्यक्तीने स्विगीवरून मुंबईतील प्रतिष्ठित लिओपोल्ड कॅफेमधून ( Leopold Cafe) ऑनलाइन जेवण ऑर्डर केले होते. उज्वल पुरी या छायाचित्रकाराला कुलाब्यातील पौराणिक कॅफेमधून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ऑयस्टर सॉसमधील चिकनमध्ये औषधाची गोळी सापडली. उज्वल पुरी याने 24 डिसेंबर रोजी X वर यासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत.

त्याच्या पोस्टसोबत या व्यक्तीने कॅप्शन लिहिले आहे की, 'माझं मुंबई ख्रिसमस सरप्राईज, कुलाब्यातील लिओपोल्ड येथून स्विगीवरून जेवण ऑर्डर केले. माझ्या जेवणात हे अर्धवट शिजवलेली औषधाची गोळी सापडली.' (हेही वाचा - Live Snail in Salad: फूड डिलिव्हरी अॅप स्विगी द्वारे ऑर्डर केलेल्या सॅलडमध्ये आढळली जिवंत गोगलगाय; व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिली 'ही' प्रतिक्रिया (Watch))

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्यक्तीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर स्विगीने उत्तर दिले की, 'आम्हाला तुमचा डीएम मिळाला आहे, तिथे भेटू.' दुसर्‍या प्रत्युत्तरात, स्विगीच्या प्रतिनिधीने लिहिले आहे की, 'आम्ही आमच्या रेस्टॉरंट भागीदार उज्वल यांच्याकडून चांगल्या अपेक्षा करतो. आम्हाला थोडा वेळ द्या.'

पहा व्हिडिओ - 

या पोस्टवर एका यूजर्सने प्रतिक्रिया दिली असून त्याने म्हटलं आहे की, 'लिओपोल्डच्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता कालांतराने खालावत चालली आहे.' तर दुसऱ्या एका X वापरकर्त्याने लिहिलं आहे की, 'अरे त्यांनी एक औषध पाठवले कारण त्यांना तुमचे पोट खराब होऊ द्यायचे नाही.'

लिओपोल्ड कॅफे हे मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे. 1871 मध्ये बांधलेले, लिओपोल्ड कॅफे हे 2008 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान हल्ले झालेल्या ठिकाणांपैकी एक होते.