Watch Video : मुंबई लोकलवर स्टंटबाजी करतानाचा 'हा' व्हिडिओ होत आहे व्हायरल
अशा स्टंटबाजांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
मुंबई लोकलमध्ये लटकून व्हिडिओ शूट करणायचा ऊत अनेक स्टंटबाजांना येतो. अशा स्टंटबाजांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
अलीकडे असाच एक स्टंटबाजीचा करतानाचा व्हिडीओ टिकटॉक या ऍपवर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण लगेचच पोलिसांनी याची दखल घेत स्टंटबाज तरुणाला ताब्यात घेतलं. हा एक 20 वर्षीय तरुण असून फैजान शेख असं त्याचं नाव आहे. तो गोवंडीतील बैंगणवाडी इथला राहणारा आहे.
टिकटॉक या ऍप वर नवनवे प्रयोग करून लोक व्हिडिओ बनवत असतात. आणि हे सर्व केलं जातं ते प्रसिद्धीसाठी. अशाच प्रसिद्धीच्या मोहापोटी या तरुणाने हा व्हिडिओ बनवला होता.
पाहा महाराष्ट्र टाइम्सने शेअर केलेला हा व्हिडिओ,
Watch Video: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा 'हा' व्हिडिओ वायरल
पण हे असं काही करणं किती घटक ठरू शकतं याचा अनेकांना विसर पडतो आणि अशा रीतीने अपघातांची संख्या वाढत जाते. या आधी असाच एक व्हिडिओ चर्नी रोड ते मारिन लाईन्स दरम्यानच्या लोकल प्रवासात शूट करण्यात आला होता. पण स्टेण्ट करत असताना पोलची धडक लागून एक मुलगा खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्याच एका मित्राने त्याच्या अपघाताचा व्हिडिओ शूट केला होता. अखेर पोलिसांनी त्या मित्राचा शोध घेतला आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली.