जावयावर सासू फिदा, लेकीचा नवरा चोरण्यासाठी केला घाणेरडा प्रकार

सुरुवातीला महिलेने दुर्लक्ष केले मात्र, आईने टाकलेले धक्कादायक पाऊल पाहून केवळ ही महिलाच नव्हे तर, चक्क जावईसुद्धा (महिलेचा पती) चाट पडला. पती, पत्नींना खरा धक्का तर तेव्हा बसला सासूने (महिलेची आई) जावयाचे फोटो चेरून ते Reddit वर शेअर केले.

प्रतिकात्मक प्रतिमा (Photo: Getty)

आजकाल कोणावर भरवसाच राहीला नाही. दक्षिण अफ्रिकेतील एका महिलेला याची पुरेपूर प्रचिती आली. या महिलेला चक्क तिच्या जन्मदात्या आईनेच दगा दिला. पती, पत्नी आणि सासूबाई (Husband, Wife and Mother-in-Law) या तिहेरी प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. घटना अशी की, या महिलेच्या पतीवर तिच्या आईचा जीव जडला. थोडक्यात सांगायचे तर सासू जावयावरच फिदा झाली. सुरुवातीला महिलेने दुर्लक्ष केले मात्र, आईने टाकलेले धक्कादायक पाऊल पाहून केवळ ही महिलाच नव्हे तर, चक्क जावईसुद्धा (महिलेचा पती) चाट पडला. पती, पत्नींना खरा धक्का तर तेव्हा बसला सासूने (महिलेची आई) जावयाचे फोटो चेरून ते Reddit वर शेअर केले.

घटनेबाबत माहिती अशी की, या प्रकरणातील सासूला आपल्या जावयांवरच प्रेम जडले. आता जावई म्हटले तर मुलीचाच पती. नैतिकदृष्ट्या असे संबंध जोडणे हे चुकीचे. सामाजिक पातळीवरही त्याला तशी मान्यता नाही. पण, प्रेम आंधळं असतं. त्यामुळे सासुबाईंना समाज, नैतिकता वैगेरे गोष्टींचा बराच विसर पडला. त्यांनी आपल्या जावयासोबत प्रेमाचे चाळे (फ्लर्ट) सुरु केले. तिचे हे चाळे इतके टोकाला पोहोचले की, ते तिच्या लेकीच्याही ध्यानात आले. जावयालाही सासूबाईंचे वागणे फारसे पटत नव्हते. त्यांनी तिला समज दिली. पण, सासूंबाईंनी काही ऐकलेच नाही. मग लेक आणि जावई असे दोघांनी मिळून सासूबाईंना ताकीद दिली. कितीही प्रयत्न केले तरी, जावई पटत नाही हे समजताच सासूबाईंचा पारा चडला. प्रेमाची भावना सुडात बदलली.

सुडात बदलली प्रेमाची भावाना

जावई हाती लागत नाही, हे ध्यानात आल्यापासून सासूबाईंचे चित्त थाऱ्यावर नव्हते. एक दिवस त्यांची मुलगी (जावयाची पत्नी) बाथरुममध्ये गेली असताना तिने मुलीचा फोन घेतला. या फोनमधून सासूने जावयाचे नग्न फोटो चोरले. मुलगी बाथरुममधून बाहेर आली तेव्हा तिच्या लक्षात आले की, आपल्या फोनसबत काहीतरी छेडछाड झाली आहे. तिने फोन स्कॅन केला तेव्हा तिच्या ध्यानात आले की, आपल्या आईने आपल्या नवऱ्याचे खासगी फोटो आपल्या (आईच्या) फोनवर फॉरवर्ड केले आहेत. पुढे हेच फोटो सासूने Reddit वर शेअर केले. (हेही वाचा, सासू चावली सुनेला, धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ)

दरम्यान, या घटनेबाबत बोलताना जावयाने सांगितले की, सासूबाईंचा स्वभाव फारच फ्लर्टी आहे. त्या प्रत्येक दिवशी कोणा ना कोणासोबत फ्लर्ट करतात. एके दिवशी त्यांनी माझ्या पत्नीच्या फोनमधून माझे फोटो चोरले आणि ते Reddit वर शेअर केले. त्यांच्या या प्रकारामुळे आम्हाला अत्यंत लाजिरवाण्या प्रकाराला सामोरे जावे लागले. त्यांच्या या स्वभावाबाबत आम्ही दोघे मिळून अनेकदा त्यांच्याशी बोलल्याचेही जावयाने सांगितल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.