Captain Monica Khanna: स्पाईसजेट विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करून मोनिका खन्नाने जिंकली सर्वांची मने; असे वाचले 185 प्रवाशांचे प्राण
फ्लाइटचे पायलट-इन-कमांड (पीआयसी) कॅप्टन मोनिका खन्ना यांनी घाबरून न जाता प्रभावित इंजिन बंद केले आणि आपत्कालीन लँडिंग केले.
Captain Monica Khanna: स्पाईसजेट (Spicejat) च्या एसजी-723 विमानाचे रविवारी बिहारमधील पाटणा विमानतळावर (Patna Airport) आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात 185 लोक होते. विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागल्याने उड्डाणानंतर लगेचच पटना येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेची माहिती पाटणा जिल्हा प्रशासन आणि विमानतळ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
स्थानिकांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये डाव्या इंजिनमधून स्पार्क निघताना दिसत आहेत. या विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाने विमानाचे लँडिग केले. यानंतर या वैमानिकाचे सर्वत कौतुक होत आहे. (हेही वाचा - Patna-Delhi SpiceJet Flight Fire: पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला आग; विमानतळावर करण्यात आले सुरक्षित लँडिंग, Watch Video)
या फ्लाइटची कमान कॅप्टन मोनिका खन्ना (Captain Monica Khanna) यांच्या हातात होती. फ्लाइटचे पायलट-इन-कमांड (पीआयसी) कॅप्टन मोनिका खन्ना यांनी घाबरून न जाता प्रभावित इंजिन बंद केले आणि आपत्कालीन लँडिंग केले.
स्पाईसजेटचे फ्लाइट ऑपरेशन्सचे प्रमुख गुरचरण अरोरा यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या हवाल्याने सांगितले की, कॅप्टन मोनिका खन्ना आणि फर्स्ट ऑफिसर बलप्रीत सिंग भाटिया यांनी या घटनेदरम्यान विमानाचे व्यवस्थित लँडिग केले. त्यांनी विमानाचे लँडिग उत्तम प्रकारे हाताळले. मोनिका खन्ना या अनुभवी अधिकारी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.