Monday Motivation: उंच भिंतीवर चढण्यासाठी कुत्र्याचे चाललेले अथक प्रयत्न आणि त्यातून मिळालेले यश पाहून अपयशाने खचून न जाण्याचा मूलमंत्र देणारा हा Viral Video एकदा नक्की पाहा
मात्र त्याला अपयश येत असून भिंतीवर चढत असताना तो कित्येकदा पडला. मात्र तरीही खचून न जाता सातत्याने त्याने आपले प्रयत्न सुरु ठेवले ज्याचे फळ त्याला मिळाला आणि तो भिंतीवर चढण्यात यशस्वी झाला.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला दिसणा-या, भेटणा-या व्यक्ती, प्राणी किंवा निर्जीव वस्तूही कळत-नकळत आपल्याला जीवन जगण्याचा मूलमंत्र (Advice) देतात. यात अलीकडच्या काळात स्पर्धा इतकी वाढली आहे की लोकांना अपयश सहन होत नाही आणि मग त्यामुळे ते नैराश्यात जाऊन व्यसनाधीन होतात वा आपले जीवन संपवून टाकतात. मात्र प्रयत्नांतूनच यश मिळते ही साधी सोपी गोष्ट ते विसरून जातात. मात्र सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या एका कुत्र्याच्या व्हिडिओने (Dog Video) असे पाऊल उचणा-या प्रत्येकास चांगलाच मूलमंत्र दिला आहे. अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहा असा मूलमंत्र या कुत्र्याच्या व्हिडिओने दिला आहे.
या व्हिडिओमध्ये हा कुत्रा एका उंच भिंतीवर चढण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला अपयश येत असून भिंतीवर चढत असताना तो कित्येकदा पडला. मात्र तरीही खचून न जाता सातत्याने त्याने आपले प्रयत्न सुरु ठेवले ज्याचे फळ त्याला मिळाला आणि तो भिंतीवर चढण्यात यशस्वी झाला.
हेदेखील वाचा- Viral Video: कुत्र्याने बकरीच्या पिल्लाला बाटलीने पाजले दूध; पहा व्हिडिओ
सांगायचे तात्पर्य असे जर या मुक्या जनावराने जगाची पर्वा न करता, कोणाचीही मदत न घेता आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि यशस्वी झाला. तर मग आपण का आपल्या आयुष्यात इतक्या लवकर हार मानतो. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की 43.5 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अवनीश शर्मा या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
सांगायचे झाले तर कुत्रा हा माणसाचा सर्वात खरा आणि ईमानदार दोस्त आहे. इतकच नव्हे तर तो सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत देखील आहे. त्यामुळे मुक्या जनावरांच्या असा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात किती गोष्टी शिकवून जातात हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल.