Mithila Palkar Hot Look: मिथिला पालकर अलिबाग मध्ये करतेय सुट्ट्या एन्जॉय, तिच्या हॉट लूकसह हटके डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
Mithila Palkar Hot Look (Photo Credits: Instagram)

मराठीतील लोकप्रिय गाणे 'ही चाल तुरु तुरु'वर कप साँग करण्यापासून परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री मिथिला पारकर (Mithila Palkar) अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेल्या मिथिलाने नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचा हटके डान्स सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिथिला सध्या अलिबागमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. तेथील तिचे हॉट फोटोज देखील सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडिओमध्ये ती इंग्रजी गाणे 'माकारिना' ची सिग्नेचर स्टेप्स करताना दिसत आहे. यासोबतच तिने फोटोज शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोला "शहारपासून खूप दूर दूर मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा उत्तम मार्ग" असं तिनं म्हंटलं होतं.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

या गाण्यामधील तिचा पांढ-या ड्रेसमधील लूक आणि स्विम स्यूटमधील हॉट लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

हेदेखील वाचा- Mithila Palkar Dance Viral Video: सुखविंदर सिंह च्या 'बन ठन चली' गाण्यावर थिरकली मिथिला पारकर, व्हिडिओला मिळाली 14 लाखांहून अधिक व्ह्यूज

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

नुकतीच मिथिला काजोलसोबत ‘त्रिभंगा’ या वेबसिरीजमध्ये झळकली होती. तर ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या मिथिलाच्या वेब सीरिज प्रचंड गाजल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी मिथिला सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह (Sukhwinder Singh) यांच्या 'बन ठन चली' (Ban Than Chali) या गाण्यावर सुंदर नृत्य केले होते. कुरुक्षेत्र चित्रपटातील या लोकप्रिय गाण्यावरील मिथिलाचा हा जबरदस्त डान्स व्हायरल झाला होता.