Mithila Palkar Dance Viral Video: सुखविंदर सिंह च्या 'बन ठन चली' गाण्यावर थिरकली मिथिला पारकर, व्हिडिओला मिळाली 14 लाखांहून अधिक व्ह्यूज

Mithila Palkar Dance Viral Video: सुखविंदर सिंह च्या 'बन ठन चली' गाण्यावर थिरकली मिथिला पारकर, व्हिडिओला मिळाली 14 लाखांहून अधिक व्ह्यूज
Mithila Palkar Viral Dance Video (Photo Credits: Instagram)

'ही चाल तुरु तुरु' या कपसाँगच्या माध्यमातून लोकांसमोर आणून आपल्यातील कलेचा आविष्कार दाखविणारी मिथिला पारकर (Mithila Palkar) अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने मराठी, हिंदी चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. तिच्या या कलागुणांमुळे तिची लोकप्रियता वाढली असून तिने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला. अलीकडेचे अभय देओल याच्यासोबत 'चॉपस्टिक' सिनेमात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटातील तिचे काम लोकांनी प्रचंड पसंत केले. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेल्या मिथिलाने नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video)होत आहे.

या व्हिडिओमध्ये मिथिला सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह (Sukhwinder Singh) यांच्या 'बन ठन चली' (Ban Than Chali) या गाण्यावर सुंदर नृत्य करताना दिसत आहे. कुरक्षेत्र चित्रपटातील या लोकप्रिय गाण्यावरील मिथिलाचा हा जबरदस्त डान्स सध्या व्हायरल होत आहे. Chopsticks Trailer: Netflix च्या 'चॉपस्टिक' सिनेमाचा ट्रेलर रीलिज, मिथिला पालकर, अभय देओल प्रमुख भूमिकेत (Watch Video)

पाहा व्हिडिओ

या व्हिडिओला आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मिथिला पालकर सोशल मिडियावर सुपरस्टार आहे. जिने लिटिल थिंग्स, गर्ल इन द सिटी सारख्या वेबसीरिजमधून काम करुन लोकांमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप सोडली. मिथिला ने आपले कप साँग्स यूट्युबवर वायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर ती खूप लोकप्रिय झाली होती. तिने मुरांबा ह्या चित्रपटात देखील काम केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2020 11:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).