Mia Khalifa हिची व्यथा; Porn Industry मध्ये पैसे तर मिळाले नाहीच पण इज्जतही गमावली म्हणत केला आश्चर्यकारक खुलासा, वाचा सविस्तर

पॉर्न स्टार मिया खलिफा हिने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कमाई व खाजगी आयुष्यात पॉर्न इंडस्ट्रीमुळे झालेली नुकसानाविषयी आश्चर्यकारक खुलासे केले आहेत.

Mia Khalifa Talks about life after porn (Photo Credits: Instagram)

पॉर्न इंडस्ट्री (Porn Industry) मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला केवळ एका व्हिडिओसाठी कोट्यवधी रुपये दिले जातात.. याशिवाय त्यांनी हा व्यवसाय स्वतः निवडल्याने वाटेल ते करायची मुभा असते असा एक सर्वसाधारण समज प्रत्येकाच्या मनात असतो. पण हा निव्वळ गैरसमज असल्याचे सांगत पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa)  हिने नुकतेच काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. मियाने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीमधून कोट्यवधी तर सोडाच पण केवळ 8.5 लाख रुपये मिळाल्याचे सांगितले, यामुळे आपल्या आयुष्याची पूर्णतः वाताहत झाली आहे आणि पर्सनल आयुष्यात इज्जतही गमावून बसल्याचे मियाने सांगितले. वास्तविक इतके दिवस बोल्ड आणि सेक्सी अवताराने ओळखली जाणाऱ्या मियाने हा खुलासा करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मिया खलिफाने आपल्या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, तिने 2014 ते 2015  च्या दरम्यान अवघे तीन महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केले होते पण या काळात आपल्यावर पॉर्न स्टार म्हणून लागलेला शिक्का आता कायम सोबत राहिला आहे. तसेच आपल्याला आता आयुष्यभर एक पॉर्नस्टार म्हणूनच ओळखले जात आहे, कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर माझ्या कपड्यांच्या आतपर्यंत सर्वांच्या नजरा अगोदरच पोहचलेल्या असतात यामुळे नेहमीच शरम वाटते, या सर्व परिस्थितीसाठी मी स्वतः जबाबदार आहे, केवळ एका नावाच्या सर्चवर माझे व्हिडीओ सर्वत्र उपलब्ध होतात असं देखील मिया म्हणाली.

दरम्यान, पॉर्न इंडस्ट्री सोडल्यावर मियाने स्वतःला कुटुंबापासूनही अलिप्त ठेवले होते. यांनतर बराच काळ ती एकटीच होती. आपल्या मुलाखतीत तिने काही चुकांसाठी कधीच माफी मिळत नाही हे मला तेव्हा समजलं होतं. पण वेळ हा सर्व जखमांवर उत्तम उपाय असतो आणि आता थोड्याफार प्रमाणात का होईना गोष्टी बदलू लागल्या आहेत, असे म्हणत आपण आता यापासून पुढे जाऊ इच्छितो असे देखील म्हंटले आहे. आश्चर्य म्हणजे यापूर्वी अनेकदा मियाने आपल्याला हे काम निवडण्यासाठी कोणताच खेद नसल्याचे म्हंटले होते.