२७२ किलो वजनाच्या महिलेने घटवले वजन; अनोखा एक्सरसाईज व्हिडिओ व्हायरल, फिटनेस गुरुंनही जोडले हात

लेनथ्रा रीड सांगते की, वजन कमी करण्याची प्रेरणा तिला तिच्या मुलांकडून मिळाली. आपल्या मुलीसाठी तिने आपले वजन कमी केले. माझे वजन कमी झालेले पाहून तिच्या चेहऱ्यावर आलेले हसू पाहून आपल्याला आनंद झाल्याचे रेनथ्रा रीड सांगते. आपण वजन कमी केल्यापासून आगोदरच्या तुलनेत आपण अधिक मोकळा श्वास घेत असल्याहेचीह रीड सांगते

Viral Exercise Videos | (Photo credit: archived, edited, representative image)

How To Lose Weight:  सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा एक्सरसाईज करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल ( Viral Exercise Videos) झाला आहे. कदाचीत आपल्याला आश्चर्य वाटेल पण, तिचा एक्सरसाईज पाहून भल्याभल्या फिटनेस गुरुंनीही (Fitness guru) हात जोडले आहेत. या महिलेचे वजन आहे 600 पाऊंड. म्हणजेच तबबल 272 किलो. इतके वजन घेऊनही ही महिला आपला फिटनेस राखण्यासाठी एक्सरसाइज (Exercise) करताना दिसते. फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत सुमारे 5 कोटींपेक्षाही अधिक लोकांनी फेसबुकवर हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, सुमारे 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. जाणून घ्या हा व्हिडिओ कोणाचा आहे आणि काय आहे ही पूर्ण कहाणी.

प्राप्त माहितीनुसार, ह व्हिडिओ लेनथ्रा रीड (Leneathra Reed ) नावाच्या महिलेचा आहे. ती मरिडिनय येथील राहणारी आहे. गेली 2 वर्षे तिचे वजन 272 किलोपेक्षा तसुभरही कमी होत नव्हते. त्यामुळे चिडलेल्या लेनथ्रा रीड हिने एक्सरसाईज सुरु केला आणि जिद्दीच्या जोरावर तो कायम ठेवला. विशेष असे की, अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिचे वजन 13 किलोंनी घटले. अत्यंत मेहनतीने वजन कमी केल्यावर लेनथ्रा हिच्यावर जगभरातील नेटीझन्स कोतुकाचा वर्षावर करत तिला शुभेच्छा देत आहेत. तिला प्रेरणा देत आतापर्यंत सुमारे 3 लाख 84 हजार पेक्षाही अधिक लोकांनी तिचा व्हिडिओ पाहून शेअर केला आहे.

लेनथ्रा रीड हिने आपला फिटनेस ट्रेनर फ्रँक हार्बिन याच्या मदतीने इतके वजन कमी केले आहे. रीड सांगते की, जेव्हा तिला वाटले की, आपले वजन कमालीचे वाढत असून हिंडण्या फिरण्यास आपल्याला अडचण होत आहे. तेव्हा, तिने वजन कमी करण्याचे ठरवले. तिचे वजन इतके वाढले होते की, तिला श्वास घ्यायलाही अडचण येत होती. त्यानंतर तिने एक्सरसाईज करण्याचा मार्ग निवडला. खालील व्हिडिओत तुम्ही लेनथ्रा रीड हिचा एक्सरसाइज करतानाचा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, 40 शी नंतर वजन कमी करण्यासाठी खास '5' टिप्स !)

लेनथ्रा रीड सांगते की, वजन कमी करण्याची प्रेरणा तिला तिच्या मुलांकडून मिळाली. आपल्या मुलीसाठी तिने आपले वजन कमी केले. माझे वजन कमी झालेले पाहून तिच्या चेहऱ्यावर आलेले हसू पाहून आपल्याला आनंद झाल्याचे रेनथ्रा रीड सांगते. आपण वजन कमी केल्यापासून आगोदरच्या तुलनेत आपण अधिक मोकळा श्वास घेत असल्याहेचीह रीड सांगते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now