Marriage Proposal Gone Wrong! रोमँटिक वातावरणात करत होता प्रपोज; 'हो' म्हटल्यावर प्रेयसी 650 फूट उंचीवरून पडली खाली

दृश्य जितके सुंदर असेल तितके वातावरण रोमँटिक होते. बर्‍याचदा अशा ठिकाणी प्रेमी युगुल आपले जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. यामुळे फक्त प्रेमाचे ते शब्दच आठवणीत कैद होत नाहीत, तर ते ठिकाणही त्यांच्या सुंदर आठवणींचे साक्षीदार बनते

Representational Image (Photo Credits: Pexels)

समुद्र किनारा असो वा बर्फाने माखलेली शिखरे... दृश्य जितके सुंदर असेल तितके वातावरण रोमँटिक होते. बर्‍याचदा अशा ठिकाणी प्रेमी युगुल आपले जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. यामुळे फक्त प्रेमाचे ते शब्दच आठवणीत कैद होत नाहीत, तर ते ठिकाणही त्यांच्या सुंदर आठवणींचे साक्षीदार बनते. अशीच एक योजना युरोपियन देश ऑस्ट्रियामधील (Austria) एका जोडप्याची होती. या प्रियकराला एका सुंदर ठिकाणी आपल्या प्रेयसीला प्रपोज करायचे होते. परंतु त्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताच आजूबाजूचा सुंदर देखावा एका भितीदायक दृश्यात बदलला. त्याच्या गर्लफ्रेंडच्या जीवावर संकट ओढवले.

आपल्या वैवाहिक जीवनात अनेक अविस्मरणीय क्षण असावे अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. यासाठी अनेक कपल्स काही हटके युक्त्या अवलंबतात. तर असेच एक जोडपे ऑस्ट्रियामधील कारिंथियातील फाल्कर्ट टेकडीवर (Falkart Mountain) रोमँटिक क्षण व्यतीत करायला गेले होते. दरम्यान, यातील 27 वर्षांच्या प्रियकराने आपल्या 32 वर्षीय प्रेयसीला प्रपोज केले. ते अतिशय सुंदर दृश्य होते. आजूबाजूला शुभ्र बर्फ, मंद वारा, उंचीवरून दिसणारे नयनरम्य दृश्य. या प्रपोजला प्रेयसीने होकारही दिला, मात्र तिने ‘हो’ म्हणताच तिचा पाय घसरला व ती जवळजवळ 650 फूट उंचीवरून खाली पडली. (हेही वाचा: दगड भिरकावून हकलणाऱ्या व्यक्तीला कांगारु ने शिकवला धडा; पहा Viral Video)

आपली प्रेयसी खाली पडत आहे हे पाहताच प्रियकरानेही तिला वाचवण्यासाठी खाली उडी मारली. मात्र तो 50 फुट खाली पडून एके ठिकाणी अडकला व प्रेयसी जमिनीवर पसरलेल्या बर्फावर पडली. यानंतर, तिथल्या एका व्यक्तीची नजर या मुलीवर पडली व त्याने लगेच पोलिसांना सतर्क केले. नंतर पोलिसांनी महिलेला सुरक्षित ठिकाणी नेले. त्याचवेळी हेलिकॉप्टरच्या मदतीने मुलालाही वाचवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या दोघांचेही नशीब बलवत्तर होते म्हणून इतक्या उंचीवरून पडूनही दोघेही जिवंत राहिले.