Marathi Tiktok Viral Stars: अबु धाबी च्या रहिवासी ज्योती सावंत यांचा मराठमोळ्या अंदाजात टिकटॉक ठरतोय हिट; तुम्ही पाहिलेत का त्यांचे 'हे' व्हायरल व्हिडीओ?

आतापर्यंत ज्योती यांचे जवळपास 4 लाख फॉलोअर्स असून त्यांच्या व्हिडीओजना 12 मिलियन म्हणजेच 1 कोटी 20 लाख पर्यंत लाईक्स आहेत.

Tiktok Viral Star Jyoti Sawant (Photo Credits: Youtube)

टिकटॉक (Tiktok) करणाऱ्यांना कामधंदे नाहीत असं एक सर्वसाधारण मत अनेकांचं असतं पण या दाव्याला सपशेल खोटं ठरवणारं एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. जर का तुम्ही टिक टॉक पाहत असाल तर ज्योती सावंत नाईकरे (Jyoti Sawant Naikare) यांचे नाव तुमच्याही ऐकिवात असेल, साधारणतः जिथे अनेकजण बॉलिवूडची गाणी, एखादा हिट डायलॉग यावर टिकटॉक बनवून हिट होत असतात तिथे सर्वात जास्त वेळा फक्त स्वतःच्या आवाजात मजेशीर व्हिडीओज बनवून ज्योती सावंत या टिकटॉकवर हिट ठरल्या आहेत. आतापर्यंत ज्योती यांचे जवळपास 4 लाख फॉलोअर्स असून त्यांच्या व्हिडीओजना 12 मिलियन म्हणजेच 1 कोटी 20 लाख पर्यंत लाईक्स आहेत. अश्लीलता किंवा अंगप्रदर्शन न करता ज्योती यांचे व्हिडीओ हिट होत असल्याने त्या टिकटॉकवर कौतुकाचा विषय ठरत आहेत.  हे झालं त्यांचं टिकटॉक आयुष्य पण त्या व्यतिरिक्त ज्योती या एक डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट म्ह्णून काम पाहतात.  Tik Tok Video: टिक टॉकवर बॉलिवूड अभिनेत्र्यांनाही मागे टाकले 'या' छोट्या मुलीने

ज्योती सावंत यांनी लेटेस्टली मराठीशी गप्पा मारताना सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला अभिनयाची आणि बोलण्याची आवड म्ह्णून सुरु केलेलं हे टिकटॉक व्हिडीओ आता अनेकांपर्यंत पोहचत आहेत. नेहमीच ताज्या मुद्यांवर आपल्या शैलीत टिपण्णी करत त्यांनी आपला अभिनयाचा छंद जोपासला आहे. सध्या त्यांनी स्वतःचे युट्युब चॅनेल सुद्धा सुरु केले असून त्याला सुद्धा 1.17K स्बस्क्राइबर्स आहेत.

ज्योती सावंत मराठी टिकटॉक व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, सध्या  अबू धाबी मध्ये वास्तव्यास असूनही मूळच्या सातार्‍या जवळच्या गोंंदवले गावच्या असणाऱ्या ज्योती यांनी आपल्या व्हिडीओ मध्ये अस्सल मराठमोळ्या अंदाजात आतापर्यंत अनेक कॉमेडी व्हिडीओ बनवले आहेत. यातील काही व्हिडीओ तर इतके हिट झालेत की फक्त टिकटॉकच नव्हे तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब सगळीकडे फक्त त्यांचाच बोलबाला पाहायला मिळतोय.