Butter Chicken खाण्यासाठी त्याने केला 32 किमी प्रवास; पोलिसांनी ठोठावला भलामोठा दंड, वाचा सविस्तर
त्यासाठी या पठ्ठ्याने एक दोन नव्हे तर चक्क 32 किमी प्रवास सुद्धा केला. पण या चिकन चा आस्वाद घेण्याआधी पोलिसांनी पकडल्याने हा प्लॅन त्याच्या वरच उलटला
लॉक डाऊन (Lockdown) लागू झाल्यापासून खवय्ये मंंडळींची पुरती पंचाईत झाली आहे. नाही म्हणायला अनेक जण घरच्या घरी वेगवेगळे पदार्थ ट्राय करुन आपली हौस भागवतायत पण आपल्या फेव्हरेट हॉटेल्स आणि रेस्टॉरंट ची आठवण काहींंना स्वस्थ बसुच देत नाहीये. असाच एक चिकनप्रेमी काही दिवसांपुर्वी आपली बटर चिकन (Butter Chicken) खाण्याची हौस भागवायला म्हणून निघाला होता. त्यासाठी या पठ्ठ्याने एक दोन नव्हे तर चक्क 32 किमी प्रवास सुद्धा केला. पण या चिकन चा आस्वाद घेण्याआधी पोलिसांनी पकडल्याने हा प्लॅन त्याच्या वरच उलटला. ऑस्ट्रेलिया (Australia) मधील मेलबर्न (Melbourne) शहरात ही घटना घडली असुन या बटर चिकन खायला निघालेल्या महाशयांंना व्हिक्टोरिया पोलिसांनी तब्बल 1652 डॉलर चा भलामोठा दंड ठोठावला आहे.. COVID 19: 'आपण Corona ला पचवू शकतो,तो आपल्याला नाही' असे म्हणत पश्चिम बंगाल मध्ये साकारण्यात आली कोरोना च्या रूपातील मिठाई (See Photos)
याहु न्युज ऑस्ट्रेलिया च्या माहितीनुसार, कोरोनाच्या भीतीमुळे याठिकाणी संपुर्ण लॉकडाउन लागु आहे, लोकांनी घराबाहेर पडु नये असे स्पष्ट आवाहन आरोग्य विभाग व पोलिसांकडुन करण्यात आले आहे. तरीही अनेक जण नियम धाब्यावर बसवुन बाहेर पडतात,अशाच 74 जणांना अलिकडे पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यात हे बटर चिकन खाण्यासाठी गाडी घेऊन निघालेले महाशय सुद्धा होते.
दरम्यान Worldometer च्या आकडेवारी नुसार, ऑस्ट्रेलिया मध्ये आजवर 19000 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत, यापैकी 700 जणांंचा मृत्यु झाला आहे, मुख्य म्हणजे 17000 रुग्णांनी कोरोनावर संपुर्ण मात केली आहे तर सद्य घडीला केवळ 1300 अॅक्टिव्ह प्रकरणंं आहेत. जगभरात आता कोरोना रुग्णसंख्येने 14 कोटींचा टप्पा पार केला असुन 6 लाखाहुन अधिक मृत्यु झाले आहेत.