Man Surrounded By Snakes: अनेक धोकादायक सापांनी वेढलेल्या जागेत कॅमेऱ्यामध्ये बोलत राहिली व्यक्ती, अचानक... (See Viral Video)  

महत्वाचे म्हणजे यातील जवळजवळ प्रत्येक सापाचा आकार अवाढव्य आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, Brewer च्या आजूबाजूला फक्त सापच साप आहेत

Man Surrounded By Snakes (Photo Credits: Twitter)

साप (Snake) हे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो. काही लोकांनी साप नुसता पाहिला तरी त्यांचे ततपप होऊ लागते. जर एखादा विषारी साप चावलाच तर कदाचित मनुष्य क्षणार्धात मृत्यूमुखी पडू शकतो, म्हणूनच जवळजवळ प्रत्येकाच्या मनात सापांची भीती असते. या परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीस धोकादायक सापांनी वेढले असल्याची कल्पना करू शकता? नाही ना? मात्र असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती अनेक धोकादायक सापांनी वेढलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विविध रंग आणि आकाराचे साप या व्यक्तीच्या अंगावरून फिरत आहेत.

कॅलिफोर्नियामधील सरपटी प्राण्याच्या प्राणिसंग्रहालयात हा व्हिडीओ शूट केला गेला असून, प्राणिसंग्रहालयाचे संस्थापक Jay Brewer सापांसमवेत बसलेले दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे यातील जवळजवळ प्रत्येक सापाचा आकार अवाढव्य आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, Brewer च्या आजूबाजूला फक्त सापच साप आहेत मात्र तरीही न घाबरता ते कॅमेऱ्याकडे पाहत बोलत आहेत. इतक्यात काही साप त्यांच्या अंगावर पडतात, ते पाहून कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल मात्र Brewer ना त्याचे काहीच वाटत नाही. (हेही वाचा: ULLU ची नवी वेबसीरिज Palang Tod 'Caretaker' चा ट्रेलर प्रदर्शित, सर्वांच्या नजरा चुकवून जरा एकट्यातच पाहा, Watch Trailer)

हा व्हिडीओला आतापर्यंत 3,731 लाईक्स मिळाले असून, 1,335 लोकांनी तो Retweet केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे. सर्वात प्रथम 2019 मध्ये हा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता @Aqualady6666 या युजर ने तो पुन्हा शेअर करत, ‘50 मिलिअन डॉलर्स दिले तरी तुम्ही इथे 1 तास व्यतीत करू शकता का?’ असा प्रश्न विचारला आहे. या व्हिडीओ खाली अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif