Man Rescue Puppy From Alligator: पाळीव कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मालकाची मगरीशी झटापट; Watch Viral Video

पाळलेले प्राणी हे घरातील सदस्याप्रमाणेच असतात. त्यामुळे सुख-दु:खाचे वाटेकरी होतात. घरातील सदस्यही त्यांचे लाड, हट्ट पुरवतात. त्यांची सुरक्षिततेची काळजी घेतात

Man Rescue Puppy From Alligator (Photo Credits: Twitter)

Man Rescue Puppy From Alligator Viral Video: पाळीव प्राणी त्यांच्यावर मालकांचे असलेले प्रेम सर्वश्रूत आहे. पाळलेले प्राणी हे घरातील सदस्याप्रमाणेच असतात. त्यामुळे सुख-दु:खाचे वाटेकरी होतात. घरातील सदस्यही त्यांचे लाड, हट्ट पुरवतात. त्यांची सुरक्षिततेची काळजी घेतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना फ्लोरिडा (Florida)येथून समोर येत आहे. एका व्यक्तीने आपल्या तीन महिन्यांच्या पाळीव कुत्राचे प्राण वाचवण्यासाठी चक्क मगरीशी लढा दिला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. 74 वर्षीय रिचर्ड विलबँक (Richard Wilbank)यांच्या पाळीव कुत्र्याला मगरीने पकडले. त्यानंतर लगेचच रिचर्ड यांनी तलावात उडी घेऊन मगरीच्या तोंडातून त्याला सुखरुप बाहेर काढले.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda)यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, "मगरीच्या तोंडातून पाळीव प्राण्याला सोडवण्यासाठी रिचर्ज विलबँक यांनी पाण्यात उडी घेतली आणि मगरीच्या तोंडातून त्याची सुखरुप सुटका करण्यात त्यांना यश आले."

पहा व्हिडिओ:

व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, पाळीव कुत्रा मगरीच्या जबड्यात अडकलेला पाहून रिचर्ड विलबँक तलावात उडी घेतात. त्यानंतर मगरीशी सामना करत तिचे तोंड उघडून पाळीव कुत्र्याची सुटका करतात. यात कुत्र्याच्या पिल्लाला पोटावर जखम होते. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात येते आणि उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif