Man Makes Reel In Middle Of Road: दिल्लीत रस्त्याच्या मधोमध खूर्ची टाकून रील बनवत होता तरुण; पोलिसांनी केली अटक, पहा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध आपली मोटरसायकल उभी केली आणि मध्येच खुर्ची ठेवून बसला. हे सर्व काम बेकायदेशीर असल्याचे आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीला सांगत आहेत. ही रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली.

Man Makes Reel In Middle Of Road (PC - X/PTI)

Man Makes Reel In Middle Of Road: आजकाल अनेक तरुण स्टंट करून सोशल मीडियावर त्यांचे फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. यासाठी ते वाहतुकीचे नियम मोडतात तर कधी  दुसऱ्याचा किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये तरुण कधी कधी बाइकवर किंवा कारच्या छतावर गोंधळ घालताना दिसतात. वास्तविक, असाच एक व्हिडिओ नॉर्थ ईस्ट दिल्लीच्या शास्त्री पार्क भागात एका व्यस्त पुलाच्या मध्यभागी खुर्चीवर बसून रील बनवणाऱ्या व्यक्तीला महागात पडला. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याची रील व्हायरल होताच पोलिसांनी तरुणाला अटक केली. सध्या पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत.

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध आपली मोटरसायकल उभी केली आणि मध्येच खुर्ची ठेवून बसला. हे सर्व काम बेकायदेशीर असल्याचे आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीला सांगत आहेत. ही रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली. (हेही वाचा -Viral Video: तरुणाला नेलं फरफटत, रिक्षाचालकाचा कारनामा, थरकाप घटनेचा Video व्हायरल)

सामग्री निर्मात्याच्या अटकेच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची मागणी केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत शास्त्री पार्क पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. पोलीस तरुणाची चौकशी करत आहेत. याआधी दिल्लीतील पश्चिम विनोद नगर परिसरात रात्रीच्या वेळी एका तरुणाने भरधाव वेगाने वाहन चालवल्याची धोकादायक घटना घडली होती. 9 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी राजौरी गार्डनमधून एका दुचाकीस्वारालाही अटक केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या केटीएम मोटरसायकलवर स्टंट करताना दिसत होता. (हेही वाचा -Man Hangs From Moving Car's Door With Plastic Wrap: मित्राला प्लास्टिकमध्ये गुंडाळून चालत्या कारच्या दरवाजाला लटकवले; धक्कादायक स्टंट पाहून नेटकरी हैराण (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

दिल्लीत दररोज असे व्हिडिओ समोर येत आहेत, जिथे तरुण आपला जीव धोक्यात घालून रील बनवत आहेत. हे रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे असे स्टंटमन प्रसिद्ध होतात आणि पैसेही कमावतात. अशा परिस्थितीत दंड भरून ते सहज सुटतात. अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे बहुतांश युजर्सचे म्हणणे आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now