Viral Video: पार्टीत फटाक्यांमुळे जखमी झालेल्या पत्नीला पतीने सावरले, पण रडणाऱ्या बाळाकडे केले दुर्लक्ष; इंटरनेट संताप व्यक्त

कंटेंट क्रिएटर परी सोनी यांनी पोस्ट केलेली ही छोटी क्लिप व्हायरल झाली आहे.

एका जोडप्याने एका पार्टीत आपल्या लहान मुलीशी “बेजबाबदार” वागणूक दाखवल्याबद्दल इंटरनेटच्या संतापाला आमंत्रित केले. कंटेंट क्रिएटर परी सोनी यांनी पोस्ट केलेली ही छोटी क्लिप व्हायरल झाली आहे. कारण अनेक सोशल मीडिया युझर्सने परी आणि तिच्या पतीची व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर जोरदार टिका केली.  या जोडप्याने, पार्टी दरम्यान, एक प्रकारचा सजवलेला प्रॅम ढकलत ज्यावर त्यांची लहान मुलगी बसलेली होती त्या ठिकाणी प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर फटाक्यांची आतषबाजी झाली आणि काही क्षणांनंतर, जळलेल्या साहित्याच्या छोट्या तुकड्यामुळे परी जखमी झाली. तिच्या पतीने लगेचच तिचे सांत्वन केले कारण दोघांनीही अपघातामुळे रडत असलेल्या मुलाकडे दुर्लक्ष केले.

पाहा व्हिडिओ -

एका वृद्ध महिलेने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि संभाव्य अपघातापासून बचाव करण्यासाठी मुलाला प्राममधून उचलले. “फक्त एक छोटीशी चूक पण मला आनंद आहे की देवाने माझ्या मुलीचे रक्षण केले. "कृपया रॉयल एंट्रीमध्ये, विशेषत: बाळाच्या पार्टीमध्ये फायर एंट्री मॅट्स लावा." अशा कॅप्शनसह सोनी यांनी पोस्ट केलेले हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या पोस्टनंतर परी आणि तिझ्या पतीवर नेटकऱ्यांनी जोरदार टिका केली. आपल्या मुली कडे लक्ष न देण्याबद्दल राग देथीस व्यक्त करण्यात आला.