पँटमधल्या जिंवत सापामुळे तरुणाची रवानगी तुरुंगात, सुरु होण्याआधीच संपला विमानप्रवास

जर्मनीमधील (Germany) बर्लिन इथल्या श्नोफेल्ड एयरपोर्ट (Berlin-Schonefeld Airport) पोलिसांनी ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार 2018च्या ख्रिसमसच्या (Christmas) रात्री या तरुणास अटक करण्यात आली.

साप तस्करास अटक | (Photo Credit: Main Customs Office Shonefeld)

भलामोठा जिंवत साप (Snake) पँटमध्ये लपवून विमानप्रवासाला निघालेल्या तरुणाची थेट रवानगी तुरुंगात झाली आहे. हा तरुण सुमारे 40 सेंटीमीटर लांबीचा जिंवत साप पँटमध्ये लपवून विमान (Flight) प्रवासाला निघाला होता. परंतू, पँटचा बदललेला आकार आणि त्याची संशास्पद हालचाल पोलिसांनी अचूक टीपली आणि त्याला अटक केली. हा तरुण या सापाला घेऊन इस्त्रायला घेऊन जाणार होता, अशी माहिती आहे.

पँटमध्ये साप लपवून विमानप्रवासाला निघालेला युवक सापांची तस्करी करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर असावा असा संशय आहे. जर्मनीमधील (Germany) बर्लिन इथल्या श्नोफेल्ड एयरपोर्ट (Berlin-Schonefeld Airport) पोलिसांनी ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार 2018च्या ख्रिसमसच्या (Christmas) रात्री या तरुणास अटक करण्यात आली. ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी या तरुणाकडे पाहिले असता त्याच्या पँटमध्ये संशयास्पद हालाचाल दिसली. पोलीस त्या तरुणाकडे निघाले असता तो संशयास्पदरित्या भरभर चालू लागला. पोलिसांनी त्याला पाटलाग करुन पकडले. (हेही वाचा, Amazon वर तीन हजारात विकली जात आहे चक्क नारळाची करवंटी; सोशल मिडियावर नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्स)

पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता पोलीसांना धक्का बसला. या तरुणाच्या पँटमधून अनपेक्षितरित्या जिवंत साप बाहेर आला. या तरुणाच्या पँटमध्ये असला भलतासलता काही प्रकार असेल अशी कल्पनाही पोलिसांनी केली नव्हती. या तरुणाकडे सोने, पैसे किंवा ड्रग्ज यासारखी काहीतरी वस्तू मिळेल असा पोलिसांचा अंदाज होता. पण घडले भलतेच. त्याच्या पँटमध्ये पिशवीत बांधलेला जिवंत साप आढळला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या तरुणाडे साप सोबत बाळगून विमान प्रवास करण्याची कोणतीही पूर्वपरवानगी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आणि थेट तुरुंगात पाठवले. परिणामी या तरुणाचा विमानप्रवास सुरु होण्याआधीच संपला.