Malaika Arora चा पाण्यात भिजलेला हा हॉट फोटो पाहून चाहत्यांना फुटेल घाम
Malaika Arora (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट (Hot) आणि ग्लॅमरस (Glamorous) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या अदा तरुणींनाही लाजवतील अशा आहेत. वयाच्या 47व्या वर्षीही तिचा हॉटनेस यत्किंचितही कमी झालेला नाही. तिचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. या फोटोजही सोशल मिडियावर बरीच चर्चा होत असते. तिचा योगापासून, वर्कआऊटपर्यंत व्हिडिओज सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत असतात. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या 2021 (Dabboo Ratnani Calendar 2021) चा कॅलेंडरमधील तिचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. पाण्यात चिंब भिजलेल्या मलायकाचा हॉट अंदाज पाहून अनेकांच्या भुवया उंचावतील.

या फोटोमध्ये मलायकाने एक हॉट वनपीस घातला आहे. यात ती पाण्यात बसली आहे. ज्यात तिचे केस आणि तिचे पूर्ण शरीर पाण्यात चिंब भिजलेले आहे. भिजलेल्या केसांमध्ये मलायका आणखीनच हॉट दिसत आहे. मलायकाच्या या फोटोला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- Malaika Arora Bold Photo: मलाइका अरोड़ा हिचा स्विमिंग पूल मधील बोल्ड फोटो; हॉट अवतार पाहुन चाहते घायाळ

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

काही दिवसांपूर्वी तिने सोशल मिडियावर स्विमिंग पूलमध्ये योगा (Yoga in Swimming Pool) करताना एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील तिचे सौंदर्य पाहून चाहतेही थक्क झाले आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वयाच्या 47 वर्षी देखील मलायकाने स्वत:ला छान फिट ठेवले आहे. वर्कआऊट आणि योगावर नेहमी भर देणारी मलायकाने आता चक्क स्विमिंग पूल मध्ये योगा केला आहे. याचा एक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.