Mahaparinirvan Diwas 2020 निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज आणि विचार ट्विटरवर ट्रेंड!

बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीम अनुयायी मोठ्या संख्येने गर्दी करतात. परंतु, यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसूनच ऑनलाईन अभिवादन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते.

Dr BR Ambedkar (Photo Credits: @AtriSahil/ @5LjkKHZA7URwgkZ/ Twitter)

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीम अनुयायी मोठ्या संख्येने गर्दी करतात. परंतु, यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसूनच ऑनलाईन अभिवादन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. विशेष म्हणजे या आवाहनाला भीम सैनिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेटकऱ्यांकडून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, फोटोज ट्विटरवर शेअर केले जात आहेत. तसंच खास मेसेज शेअर करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. हे सर्व मेसेजेस, फोटोज, विचार ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. (यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरबसल्या करा Online अभिवादन; येथे अनुभवा दादर चैत्यभूमी येथील लाईव्ह सोहळा, Video)

सोशल मीडियावर ट्रेंड होणारे मेसेजेस महामानवाच्या कार्याची, महतीची पुन्हा एकदा जाणीव करुन देतात आणि समाजावर असलेला आंबेडकरांचा प्रभाव अधोरेखित करतात. पाहुया ट्विटरवर ट्रेंड होणारे मेसेजेस...

ट्विटरवर ट्रेंड होणारे मेसेजेस!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्कृष्ट नेता होते. त्यांनी आपल्या सुंदर विचारांनी दलितांवर होणारा अन्यान दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तरुणांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अखंड कार्य केले. त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती नक्कीच प्रेरणादायी आहे. अशा या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!