Insects and Worms Found in Pizza: मध्य प्रदेशमधील शहडोल येथे पिझ्झामध्ये आढळल्या अळ्या; तक्रार करताच दुकानादाराने दिले हवामान बदलाचे कारण (Watch Video)
या घटनेनंतर, तो माणूस त्या दुकानात गेला जिथून त्याने पिझ्झा खरेदी केला आणि त्याबद्दल तक्रार केली.
Insects and Worms Found in Pizza: पिझ्झा चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. कारण, आता नुकत्याच समोर आलेल्या घटनेत पिझ्झामध्ये जिवंत आळ्या आढळून(Worms Found in Pizza)आल्यात. मध्य प्रदेशातील शहडोलमधून ही घटना उघडकीस आली. पिझ्झा घरी घेऊन आलेल्या एका तरुणाने बॉक्स उघडताच पिझ्झाच्या आत तरुणाला आळ्या रेंगाळताना दिसल्या. @Khushbu_journo नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ समोर आला आहे.
पिझ्झातील आळ्यांचा हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. व्हायरल क्लिपमध्ये, तो माणूस त्याला पिझ्झामध्ये किडे आणि जंत आढळल्याचे म्हणात आहे. या घटनेनंतर, तो माणूस त्या दुकानात गेला जिथून त्याने पिझ्झा खरेदी केला. त्याबद्दल तक्रार केली. त्यावर दुकानदाराने अचंबीत करणारे उत्तर दिले. हवामानातील बदलामुळे पिझ्झामध्ये स्वतःहून अळ्या आल्याचे दुकानदाराने उत्तर दिले. (Karnataka Building Collapse: कोलारच्या बांगारापेट शहरात नूतनीकरणादरम्यान 3 मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video))