IPL Auction 2025 Live

मध्य प्रदेशात महिलेसोबत धक्कायक वागणूक, तरुणाला खांद्यावर बसवून 3 कमी चालण्याची केली जबरदस्ती (Watch Viral Video)

तिच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तवणूक ऐवढी क्रूर आहे की, ते पाहून आपल्याल्या सुद्धा लाज वाटेल. व्हिडिओ हा सागई आणि बांसखेडी गावातील आहे.

मध्य प्रदेश व्हायरल व्हिडिओ (Photo Credits-Twitter)

मध्य प्रदेशातील गुना शहरातील एका आदिवासी महिलेसोबत झालेल्या अपराधाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. तिच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तवणूक ऐवढी क्रूर आहे की, ते पाहून आपल्याल्या सुद्धा लाज वाटेल. व्हिडिओ हा सागई आणि बांसखेडी गावातील आहे. व्हिडिओत एका महिलेला शिक्षा दिली गेली असून तिच्या खांद्यावर एक तरुण दिसत आहे तो तिच्या मेहुणा असून त्याला घेऊन 3 किमी पायी चालवण्यास सांगितले गेले. महिलेला काही लोकांनी चालण्यास सुद्धा जबरदस्ती करत मारहाण करताना सुद्धा दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींच्या विरोधात तक्रार सुद्धा करण्यात आली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महिलेने असे सांगितले ती विवाहित असून तिचा पहिला नवरा बांसखेडी येथे राहतो. त्याने मला सोडल्यानंतर आणि त्यांचा सहमती नंतर दुसऱ्या नवऱ्यासोबत राहते. महिला बांसखेडा येथून 3 किमी असलेल्या सागई गावात राहते. तिने पुढे असे सुद्धा म्हटले की, तिच्या परिवाराला हे सर्व माहिती होते की, दुसऱ्या नवऱ्यासोबत ती राहत होती. पण अचानक काही लोक तिच्या नव्या सासरी आले आणि तिचा मारहाण करत आधीच्या सासरी घेऊन गेले. (पंजाब: घरातल्यांच्या मर्जीच्या विरोधात लग्न केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी जाळले मुलाचे घर)

Tweet:

पुढे पीडित महिलेने असे म्हटले की, तिला तेथे 3 किमी पायी चालवत नेले पण तिच्या दिराला सुद्धा तिच्या खांद्यावर बसवले. या व्यतिरिक्त महिला चालत असताना तिला मारहाण केली गेली. तेथे असलेल्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट केला आणि तो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आता या प्रकरणाची पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता पर्यंत चार लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.