Lamborghini Car Fire Video: गुंडांनी पेटवली 4 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी स्पोर्ट कार; तेलंगानातील रंगारेड्डी येथील घटना (पाहा व्हिडिओ)
गुंडांनी पेटवलेली गाडी आलिशान लॅम्बो्गिनी स्पोर्ट कार (Lamborghini Car Sports Car) होती. कथीतरित्या सांगितले जात आहे की, कारमालकाने काही लोकांकडून पैसे उधारीवर घेतले होते. उधारीवर घेतलेले 80 लाख रुपये परत न केल्याने आरोपींनी हे कृत्य केले. कार आगीच्या भक्षस्थानी पडलेली पाहून स्वत: पीडित व्यवसायिकाने स्वत:च फोन करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली.
Luxury Car Fire Video: कर्जाऊ घेतलेली रक्कम परत न केल्याने चिडलेल्या काही गुंडांनी एका व्यवसायिकाची तब्बल कोट्यवधी रुपयांची स्पोर्ट कार पेटवून घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना तेलंगाना (Telangana) राज्यातील रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यात येणाऱ्या बडंगपेठ येते घडल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, गुंडांनी पेटवलेली गाडी आलिशान लॅम्बोर्गिनी स्पोर्ट कार (Lamborghini Car Sports Car) होती. कथीतरित्या सांगितले जात आहे की, कारमालकाने काही लोकांकडून पैसे उधारीवर घेतले होते. उधारीवर घेतलेले 80 लाख रुपये परत न केल्याने आरोपींनी हे कृत्य केले. कार आगीच्या भक्षस्थानी पडलेली पाहून स्वत: पीडित व्यवसायिकाने स्वत:च फोन करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली.
सेकंड हँड लॅम्बोर्गिनी स्पोर्ट्स कार
दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत पहाडीशरीफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग येथील व्यावसायिक नीरज याने लॅम्बोर्गिनी स्पोर्ट्स कार सेकंड हँड खरेदी (2009 मॉडेल डीएल09 सीव्ही 3636) केली होती. सध्या या नवीन कारची किंमत सुमारे चार कोटी रुपये असेल. ही नीरजला कार विकायची होती. त्या संदर्भात त्याने काही लकांशी बोलणी सुरु केली होती. त्याने अयान नावाच्या ओळखीच्या व्यक्तीलाही कार विकण्याबद्दल सांगितले होते. अयान याने आलिशान कार विक्रीची माहिती मुघलपूर येथील त्याचा मित्र अमन याला दिली. अमन याने सांगितले की, त्याचा मित्र अहमद हा पार्टी आहे. तो कार खरेदीरसाठी तयार आहे. त्यासाठी कारची एक ट्रायल घ्यावी लागेल. (हेही वाचा, Cheating at Petrol Pump in Telangana: तेलंगणातील वारंगलमध्ये पेट्रोल कर्मचाऱ्याकडून पेट्रोलची चोरी, व्हिडिओ आला समोर)
कारची ट्रायल घेताना गुंडांसोबत शाब्दिक वाद
कारची ट्रायल देण्यासाठी व्यवसायिक नीरज हा आपली लॅम्बोर्गिनी कार घेऊन ठरल्याप्रमाणे मामीदिपल्ली ते शमशाबाद या मार्गावर असलेल्या फार्म हाऊसवर घेऊन गेला. या ठिकाणी कार घेऊन येण्याची सूचना अहमद यानेच केली होती. जो अमन याच्याकडून आलेला कार खरेदीदार पार्टी होता. दरम्यान, नीरज याने कार आणून देताच अमनने त्याचा मित्र हंडण याच्यासोबत स्पोर्ट कार जलपल्ली येथे नेली. दरम्यान, ती विमानतळ मार्गाच्या मध्यभागी मामिडी पॅली येथे असलेल्या विवेकानंद स्टॅचजवळ थांबवली. याच वेळी अमदसोबत इतर काही लोक आले आणि त्यांनी विचारले की, नीरज (कारमालक) कोठे आहे. ते त्यांच्याकडे पैसे मागू लागले. तसेच शिवीगाळ करु लागले.
व्हिडिओ
दरम्यान,नीरजच्या नावाने शिवीगाळ करणाऱ्या आणि अहमद याच्यासोबत आलेल्या काही लोकांनी बाटलीत पेट्रोल भरुन ती स्पोर्ट कारमध्ये टाकली तिला आग लावली. पुढच्या काहीच क्षणात आलिशान लॅम्बोर्गिनी कारने पेट घेतला. दरम्यान, कारमालक नीरज त्या ठिकाणी आला तेव्हा त्याला कार पेटलेल्या आवस्थेत दिसली. त्याने तातडीने 100 क्रमांक डायल करत पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, पहाड शेरीफ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र, तत्पूर्वीच कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. महेश्वरमचे एसीपी पी. लक्ष्मीकांत रेड्डी, पहाड शेरीफ इन्स्पेक्टर गुरुवा रेड्डी, एसएसआय मधुसूदन यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. कारमालकाने फिर्यादीनुसार पहाड शरीफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)