Ludwig Guttmann Google Doodle: न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल; जाणून घ्या त्यांचे कार्य

लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच, 29 जुलै 1948 रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटलमध्ये (Stoke Mandeville Hospital) युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते. यामधील सर्व सहभागींना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती.

Ludwig Guttmann Google Doodle (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील महत्वाच्या घटना, लोकप्रिय व्यक्तींचे जन्मदिन-स्मृतिदिन अशा अनेक गोष्टी गुगल आपल्या खास डूडलद्वारे आपल्या समोर मांडत असते. आज गुगल न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन (Ludwig Guttmann) यांचा 122 वा जन्मदिन साजरा करत आहे. यासाठी गुगलने एक खास डिझाईन बनवले असून त्यामध्ये लुडविग गुटमन यांचे कार्य दर्शवण्यात आले आहे. सर लुडविग ‘पॉपपा’ गुट्टमॅन हे एक जर्मन-ब्रिटीश न्यूरोलॉजिस्ट होते, ज्यांनी इंग्लंडमध्ये अपंगांसाठी पॅरालिम्पिक गेम्स, स्पोर्टिंग इव्हेंट 'स्टोक मॅंडेविले गेम्स'ची स्थापना केली. सध्या ही स्पर्ध ऑलिम्पिक इतकीच महत्वाची मानली जाते.

3 जुलै 1899 रोजी जन्मलेल्या लुडविग गुट्टमॅन यांचा जन्म टोस्ट जर्मन साम्राज्य, येथे झाला. सध्या हे शहर पोलंडमध्ये आहे. जेव्हा ते 3 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब सिलेशियनमध्ये (Silesian) मध्ये शिफ्ट झाले. याच शहरातून त्यांनी 1917 मध्ये माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले. 1918 मध्ये त्यांनी University of Breslau येथून आपला मेडिकलचा अभ्यास सुरु केला. हा अभ्यास 1924 मध्ये पूर्ण झाला. 1933 मध्ये ते एक न्यूरोसर्जन म्हणून काम करू लागले होते आणि त्याचबरोबर युनिवर्सिटीजमध्ये लेक्चर देखील देत असत.

लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच, 29 जुलै 1948 रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटलमध्ये (Stoke Mandeville Hospital) युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते. यामधील सर्व सहभागींना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. या सर्वांनी व्हीलचेअर्समध्ये भाग घेतला होता. आपल्या रूग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी गुट्टमन या 'पॅराप्लेजिक गेम्स' हा शब्द वापरायला सुरुवात केली. त्यानंतर हा 'पॅरालंपिक खेळ' म्हणून ओळखला जाऊ लागला.

पुढे 1952 पर्यंत, 130 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी स्टोक मॅंडेविले गेम्समध्ये सहभाग नोंदवला होता. 1956 च्या स्टोक मॅंडेविले गेम्समध्ये, गुट्टमॅन यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ‘सर थॉमस फेर्नली चषक’ देऊन सन्मानित केले. (हेही वाचा: WHO चे मोठे विधान, EURO 2020 स्पर्धेमुळे युरोपात वाढतोय कोरोनाचा संसर्ग)

1960 साली रोममध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक सोबतच 'आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स'चे आयोजन केले गेले. हा 9 वा वार्षिक आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स म्हणून ओळखला जातो. त्यांनी 1961 मध्ये British Sports Association for the Disabled ची स्थापना केली. ऑक्टोबर 1979 मध्ये गुट्टमॅन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 80 व्या वर्षी 18 मार्च 1980 रोजी त्यांचे निधन झाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now