Lockdown: रामदास आठवले यांची नवी कविता, 'हम अभी हैं गंभीर मोड़ पर, क्यों आ रहे हो आप रोड पर'
आपल्या अनेक राजकीय प्रतिक्रिया ते कवितेच्या माध्यमातूनच देतात. अनेकदा या कविता केवळ यमक रुपाच्या असतात. कोरोना व्हायरसचे भारतात नुकतेच आगमन झाले होते. दरम्यान, 'गो कोरोना गो' असा नारा देत रामदास आठवले हे प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरले होते.
देशात रेड झोन असणाऱ्या ठिकाणचा लॉकडाऊन (Lockdown) 30 मे पर्यंत वाढविण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. त्यासोबतच 'हम अभी हैं गंभीर मोड़ पर, क्यों आ रहे हो आप रोड पर' अशी कविता करत आठवले यांनी नागरिकांना रस्त्यावर गर्दी टाळण्याचा आणि घरात बसून लॉकडाऊनचे नियम पाळण्याचा संदेश दिला. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जाहीर केला आहे.
रामदास आठवले यांची कविता
'कोई भी मत आइए रोड पर, मैं विनती करता हूं हाथ जोड़कर
हम अभी हैं गंभीर मोड़ पर, क्यों आ रहे हो आप रोड पर
कोई भी आप मत रोना, क्योंकि बहुत जल्द जाएगा यहां से कोरोना।'
(हेही वाचा, Lockdown: रेड झोनमधील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवा- रामदास आठवले)
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या अनेक राजकीय प्रतिक्रिया ते कवितेच्या माध्यमातूनच देतात. अनेकदा या कविता केवळ यमक रुपाच्या असतात. कोरोना व्हायरसचे भारतात नुकतेच आगमन झाले होते. दरम्यान, 'गो कोरोना गो' असा नारा देत रामदास आठवले हे प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरले होते. सोशल मीडियावरही आठवले यांचा हा नारा प्रचंड व्हायरल झाला होता.