ठाणे शहरातील रस्त्यांवर फिरतोय Leopard? जाणून घ्या 'या' Viral Video मागील सत्य

काय आहे हा व्हिडीओ आणि काय आहे त्यामागील सत्य हे या विशेष फॅक्ट चेक (Fact Check) आर्टिकल मधून जाणून घ्या.

Viral Video of Leopard Roaming On The streets of Thane (Photo Credits: Twitter)

लॉक डाऊन (Lockdown)  सुरु झाल्यापासून एकीकडे रस्त्यांवरील गर्दी  गायब झाली असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी प्राणी, पक्षी मुक्तपणे संचार करताना आढळून येत आहेत. याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अर्थात यातील मोर, डॉल्फिन किंवा वेगवेगळे पक्षी स्पॉट झाल्याचे पाहून सर्वांनाच गंमत वाटतेय, पण काही व्हिडीओज मध्ये चक्क जंगली प्राणी सुद्धा रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत असल्याने तिथे मात्र अनेकांची घाबरगुंडी उडते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ठाणे (Thane) शहरातील उपवन (Upvan) जवळील भागात, पवार नगर आणि बेथनी रोड दरम्यान एक चित्ता (Leopard Romaning On Road)  रस्त्यावर फिरत असल्याचे दाखवले जात आहे. काय आहे हा व्हिडीओ आणि काय आहे त्यामागील सत्य हे या विशेष फॅक्ट चेक (Fact Check) आर्टिकल मधून जाणून घ्या. नाशिक येथे लॉकडाउनच्या काळात मेरी कॉलनीत मोरांचा मुक्त वावर, पहा व्हिडिओ

ठाणे शहरात रस्त्यावर खरंच फिरतोय चित्ता?

ठाणे शहरातील उपवन जवळील भागात, पवार नगर आणि बेथनी रोड दरम्यान एक चित्ता रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओची पडताळणी केली असता हा व्हिडीओ जरी खरा असला तरी हा ठाण्यातील व्हिडीओ नाही हे स्पष्ट झाले आहे. फॅक्ट चेक नुसार हा व्हिडीओ जुना असून तिरुपती मधील आहे. याविषयी स्वतः ठाणे जिल्ह्यातील वन्य विभाग अधिकारी एन. बी. मुठे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच ठाण्यातील बेथनी हॉस्पिटल रोड वर वन्यविभागच्या कर्मचाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली मात्र त्या भागात चित्ता प्रत्यक्ष आढळला नाहीच, तसे नागरिकांपैकीही कोणी त्याला पाहिलेले नाही.

पहा व्हायरल व्हिडीओ

हा मूळ व्हिडीओ तिरुपती मधील असून बराच जुना आहे, युट्युबवर हा व्हिडीओ उपलब्ध असून त्याच आधारे ही पडताळणी करण्यात आली आहे.

पहा मूळ व्हिडीओ

दरम्यान, असे अनेक फेक व्हिडीओ हल्ली दरदिवशी सोशल मीडियावर पाहायला मिळतात, यातून विनाकारण सर्वांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणाकडूनही विना पडताळणी करता असे कोणतेही चुकीचे मॅसेज किंवा व्हिडीओज फॉरवर्ड होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे.