Shirdi Sai Baba: लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यांना दिसला शिर्डी साईबाबांचा चमत्कार, व्हिडिओत केला दावा

त्यांनी सांगितले की, आपण शिर्डी साईबाबांची मालिका पाहत होतो.

Tej Pratap Yadav, Sai Baba (PC - PTI and Wikimedia Commons)

बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तसेच, आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी आपल्यासोबत शिर्डी साई बाबा ( Shirdi Sai Baba) यांचा चमत्कार घडल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, आपण शिर्डी साईबाबांची मालिका पाहत होतो. दरम्यान, रात्री त्यांना साईबाबांचे स्मरण झाले. मनात बाबांकडे प्रार्थना केली आपल्याला साई बाबांचा प्रसाद मिळावा. दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला. त्यांच्या टेबलावर 'बाबांच्या प्रसादा' चे पॅकेट मिळाले. हा एक चमत्कारच होता. असा चमत्कार या पूर्वी कधीही पाहायला मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. तेजप्रताप यांचा व्हिडिओ

तेज प्रताप यादव यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या घरी साईबाबांची मालिका पाहत होते. त्यात दाखवले जात होते की, की साई बाबा लोकांचे आजार आणि समस्या भयमुक्त करत असत. तेज प्रतापने बाबांची मनापासून आठवण केली आणि त्यांनाही भेटावे अशी इच्छा व्यक्त केली. तर खरोखरच बाबा त्यांना भेटले. या आधी कधीही असा चमत्कार घडला नाही.

तेज प्रताप यांनी व्हिडिओत पुढे म्हटले आहे की, दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या घरी कार्यालयात आले असता ते टेबलावर प्रसादाचे पाकीट होते. तेज प्रताप यांचा दाा असा की हा 'साई बाबा का चमत्कार आहे'. तेज प्रताप सांगतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात यापूर्वी कधीही असा प्रकार अनुभवला नव्हता. आपल्याला हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याचे ते व्हिडिओत आवर्जून सांगताना दिसतात.

व्हिडिओ

या आधीही अनेक लोकांनी शिर्डी साईबाबाचा चमत्कार दिसल्याचे म्हटले होते. जगभरात असे अनेक लोक काही ना काही दावे करत असतात. यातील बहुतेक दावे हे केवळ स्वप्नरंजन आणि नावापूरतेच असतात. त्यातील खूपच कमी दावे विज्ञानाच्या कसोटीवर टीकल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याची संख्या अगदीच नगण्य आहे. त्यामुळे तेज प्रताप यांच्या दाव्यावरही अनेकांनी विश्वास ठेवला नाही. पण, ते दावा मात्र खूपच जोर देऊन करताना व्हिडिओत दिसतात.