Sehaj Arora | Photo Credit- Instagram)

जालंधर येथील कुल्हड पिझ्झा कपल (Kulhad Pizza Couple Viral Video) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. हे जोडपे म्हणजे सहज अरोरा (Sehaj Arora) आणि गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur).मधल्या काळात त्यांचा एक कथीत अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अर्थात हा व्हिडिओ आपला असल्याचे या जोडप्याने फेटाळले होते. तसेच, लेटेस्टली आणि इतर माध्यमांकडूनही त्याची पुष्टी होऊ शकली नव्हती. दरम्यान, आता हे जोडपे नव्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ज्यामध्ये गुरप्रीत कौर आकर्षक हरियाणवी पोषाखांमध्ये डान्स करतना पाहायला मिळते. तिच्या नव्या लूक आमि नृत्यांतील हवाभावांनी चाहत्यांना नवे काहीतरी दिले आहे.

हरियाणवी पोषाख आणि डान्स

इन्स्टाग्रामवर सेहज अरोरा हिने 'तागी" या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कौर उपासना गेहलोतच्या लोकप्रिय हरियाणवी गाण्यावर नाचताना दिसत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या या गाण्याने आगोदरच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यात कौरच्या उत्साही तालावरील नृत्याने त्याची प्रसिद्धी आणखी वाढवली आहे. तिच्या पारंपारिक हरियाणवी पोशाखाने, नृत्याच्या हालचालींसह, व्हिडिओला इंटरनेट वापरकर्त्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तसेच, विविध प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ शेअरही केला जात आहे. (हेही वाचा, Kulhad Pizza Couple Viral Video: कुल्हड पिझ्झा कपल पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

चाहत्यांमध्ये फूट पडली, पण पाठिंबा वाढला

या व्हिडिओला कौरच्या कामगिरीबद्दल अनेक प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली, परंतु या जोडप्याच्या भूतकाळातील वादाबद्दलच्या इतिहासालाही पुन्हा उजळणी मिळाली आहे. जालंधरमधील त्यांच्या कुल्हड पिझ्झा कपल हे दुकानातून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या जोडीला, त्यांचा कथितपणे दाखवलेला आणि स्पष्ट दिसणारा व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता घसरल्याचे दिसले. ज्यामुळे या जोडप्याचा आणि कथीत व्हिडिओचा व्यापक विरोध झाला. तथापि, त्यांच्या ताज्या व्हायरल पोस्टमुळे त्यांच्या ऑनलाइन उपस्थितीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसते. जोडप्याच्या काही चाहत्यांनी त्यांना इतिहास विसरुन पुढ जा, असेही अवाहन केले आहे. (हेही वाचा, Kulhad Pizza Viral Video Couple's Romantic Reels: सहज अरोरा-गुरप्रीत कौर, इंटरनेट सेन्सेशन्स लीक झालेल्या एमएमएसनंतर पोस्ट केले सुंदर रिल)

सेहेज आरोरा यांचा डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Sehaj Arora (Kulhad Pizza) 🇮🇳 (@sehaj_arora_)

कथीत सेक्स व्हिडिओ पुन्हा चर्चेत

या जोडप्याला पाठिंबा देणाऱ्या वापरकर्त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काहींनी त्यांना नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, "ट्रोल्सकडे दुर्लक्ष करा आणि आपले जीवन जगा". आणखी एकजण म्हणाला, "चुका प्रत्येकाच्याच होतात. त्यांना शांततेत जगू द्या. त्यांच्या मुलाचा विचार करा''. दरम्यान, सर्वच प्रतिक्रिया सकारात्मक नाहीत. काही समीक्षक या जोडप्याला त्यांच्या भूतकाळाची आठवण करून देत राहिलेले दिसतात. एकाने म्हटले आहे की, "जर जग तुमच्या विरोधात असेल तर मी जगाबरोबर आहे".

सोशल मीडियात पुनरागमन

कुल्हड पिझ्झा जोडप्याच्या सोशल मीडिया ट्रेंडमध्ये परत येण्याने माफी आणि ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पाठीमागे एकनिष्ठ चाहता वर्ग असल्याने, या वेळी योग्य कारणांसाठी ही जोडी पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याची तयारी करत असल्याचे दिसते. जसजसे ते मजकूर सामायिक करत राहतात, तसतसे त्यांच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि नवीन उपक्रमांना पाठिंबा सातत्याने वाढत आहे.