Krystal Jackson: अल्पवयीन मुलावर बलात्कार करणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेला अटक
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

14 वर्षांच्या मुलावर बलात्कार(Rape)केल्याच्या आरोपाखाली एका विवाहित महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. विवाहित शिक्षिकेला एका खाजगी अभ्यास सत्रादरम्यान 14 वर्षांच्या मुलावर किमान तीन वेळा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 39 वर्षीय क्रिस्टल जॅक्सन (Krystal Jackson) वर कॅलिफोर्नियामध्ये वर्षभराच्या चौकशीनंतर तिने एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. (Boy Rapes Girl in Train Toilet: ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल, ठाणे पोलिसांची कारवाई )

डनलॉप लीडरशिप अकादमीमध्ये स्वतंत्र अभ्यास सत्रादरम्यान शिक्षिकेने 14 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. योर सेंट्रल व्हॅलीनुसार, जॅक्सनला शुक्रवारी अटक करण्यात आली आणि तिला 2,15,000 डॉलरच्या जामिनावर ठेवण्यात आले आहे. फ्रेस्नो काउंटीचे शेरिफ लेफ्टनंट ब्रँडन पर्सेल म्हणाले की, 'श्रीमती जॅक्सन कोठडीत आहेत.आमचा विश्वास आहे की तो लहान मुलगा सुरक्षित आहे, ज्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत, परंतु इतर ही पिडीत आहेत की नाही हे आम्हाला अजुन माहित नाही.

जॅक्सनवर आरोप आहे की तिने वर्षातून कमीतकमी तीन वेळा किशोरवयीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवले होते आणि ती नियमितपणे आठवड्यातून एकदा विद्यार्थ्याला डनलोप लीडरशिप अकादमीमध्ये स्वतंत्र अभ्यास सत्रासाठी भेट देत असे. जॅक्सनवर बलात्काराच्या चार गुन्ह्यांचा आरोप आहे, ज्यात लहान मुलासोबत मौखिक संभोग, लहान मुलासोबत असभ्य कृत्ये, गुन्हेगारी आणि पोर्नोग्राफिक हेतूने मुलाशी भेटणे यांचा समावेश आहे.