केरळमधील शासकीय वृद्धाश्रमातील 60 वर्षीय वृद्ध जोडप्याने केला विवाह!
याचा प्रत्येय केरळमधील एका खास घटनेतून आला आहे. केरळमधील एका वृद्ध जोडप्याने वय वर्ष 60 ओलांडलं असतानादेखील विवाह केला आहे. केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील एका शासकीय वृद्धाश्रमामधील कोचानियान मेनन (वय- 67) आणि लक्ष्मी अम्मल (वय- 65) यांचा विवाह मोठ्या थाटामाटात 28 डिसेंबरला पार पडला आहे.
असं म्हणतात की, लग्नाला वयाचे बंधन नसतं. याचा प्रत्येय केरळमधील एका खास घटनेतून आला आहे. केरळमधील एका वृद्ध जोडप्याने वय वर्ष 60 ओलांडलं असतानादेखील विवाह केला आहे. केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील एका शासकीय वृद्धाश्रमामधील कोचानियान मेनन (वय- 67)(Kochaniyan Menon) आणि लक्ष्मी अम्मल (वय- 65) (Lakshmi Ammal) यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात 28 डिसेंबरला पार पडला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
शासकीय वृद्धाश्रमामध्ये राहणारे कोचानियान आणि लक्ष्मी हे दोघे 30 वर्षांपासून एकमेंकाना ओळखतात. लक्ष्मी यांचे पती कृष्णअय्यर यांचे 21 वर्षांपूर्वी निधन झाले. कोचानियान हे लक्ष्मी यांच्या पतीचे सहाय्यक होते. कृष्णअय्यर यांच्या मृत्यूनंतर कोचानियान यांनी वेळोवेळी लक्ष्मी यांना मदत केली. कोचानियन यांनी लक्ष्मी यांना 'रामवर्मपुरम' वृद्धाश्रमात सोडले होते. त्यानंतर त्या दोघांची 5 वर्षे भेट झाली नव्हती. काही वर्षांनंतर ते रामवर्मपुरम वृद्धाश्रमात एकमेकांना भेटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा - प्राणीसंग्रहालयात वाघाचा लहान मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न; पाहा 'कसे' वाचले चिमुरड्याचे प्राण)
कोचानियान आणि लक्ष्मी यांचा शुक्रवारी मेंहदीचा कार्यक्रम पार पडला. तसेच शनिवारी हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला कृषी मंत्री व्ही. एस सुनिल कुमार यांनी उपस्थिती लावली होती.