Kashmir च्या बर्फाच्छादित रस्त्यांवर Amazon Delivery Boy घोडेस्वारी करत पोहचवतोय पार्सल; Viral Video मधून समोर आली व्यवसायातील कल्पकता
त्यामुळे कोविड 19 मध्ये लोकांची गैर सोय टाळण्यासाठी हा डिलेव्हरी बॉय सोशल डिस्ट्न्सिंग पाळत आपलं काम करत आहे. त्याची ही कल्पकता अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
जगभरात कोविड 19 चा फैलाव झाला आणि बघता बघता सारं जग जागीच स्तब्ध झालं. अनेकांच्या नोकर्या गेल्या. पण न्यू नॉर्मलचं सूत्र स्वीकारत अनेकांनी पुन्हा जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या काळात ई कॉमर्स साईट्सना सुगीचे दिवस आले होते. ऑनलाईन रिटेलिंग क्षेत्राने बाजरात कब्जा मिळवला होता. डिलेव्हरी नेटवर्किंग विस्तारत असताना आता यामध्ये कल्पकता देखील येण्यास सुरूवात झाली आहे. कश्मीरच्या बर्फाच्छादित रस्त्यांवर चक्क अमेझॉनचा डिलेव्हरी बॉय घोडेस्वारी करत घरोघरी पोहचवत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कोविड 19 प्रोटोकॉलचं पालन करत त्याने काम सुरू ठेवलं आहे. सोशल मीडीयातील या वायरल व्हिडिओमधून बिझनेसचं एक नवं मॉडेल समोर आलं आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तरीही इच्छा तिथे मार्ग असतोच.
काही दिवसांपूर्वी अमेझॉनने ग्राहकांपर्यंत त्यांची पार्सल्स वेळेमध्ये पोहचावीत म्हणून जेट्स, वेस्ट जेट एअरलाईन द्वारा डिलेव्हरी सुरू केल्याचं देखील पहायला मिळालं होतं. दरम्यान आता ज्या भागात बर्फ़ामधून टू व्हिलर जाऊ शकत नाही तेथे घोड्यावर स्वार होऊन पार्सल पोहचवण्याचं काम होणार आहे. PTI photojournalist, Umar Ganie याने ट्वीटरवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ श्रीनगर कश्मीर मधला आहे. रस्त्यांवर बर्फांचा थर आहे. पण घोड्यावर स्वार डिलेव्हरी बॉय त्याच्या थाटात, तोंडावर मास्क लावून पार्सल देत आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने आता Amazon वर उपलब्ध होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती.
कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे कोविड 19 मध्ये लोकांची गैर सोय टाळण्यासाठी हा डिलेव्हरी बॉय सोशल डिस्ट्न्सिंग पाळत आपलं काम करत आहे. त्याची ही कल्पकता अनेकांना प्रेरणा देणारी आहे.