काश्मीर मधील चौकीदाराच्या जुळ्या मुलांचे NEET 2020 मध्ये घवघवीत यश! पहा आनंदी क्षणांचे फोटोज आणि व्हिडिओ
गोहर बशीर भट आणि शकीर बशीर भट अशी या दोन भावांची नावे आहेत.
काश्मीर (Kashmir) मधील बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील तांगमार्ग (Tangmarg) भागात राहणाऱ्या दोन जुळ्या भावांनी नीट 2020 परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. गोहर बशीर भट (Gowhar Bashir Bhat) आणि शकीर बशीर भट (Shakir Bashir Bhat) अशी या दोन भावांची नावे आहेत. या दोघांनाही अनुक्रमे 720 पैकी 651 आणि 657 गुण प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे 2019 मध्ये त्या दोघांनीही जेईई मेन्स परीक्षा क्रॅक केली होती. त्यानंतर त्यांनी बी.टेक (B.Tect) साठी एनआयटी श्रीनगर (NIT Srinagar) मध्ये प्रवेश घेतला होता. परीक्षेतील यश हा आनंदी आणि अभिमानाचा क्षण असल्याचे गोहर बशीर भट याने Kashmir News Observer शी बोलताना सांगितले.
पुढे तो म्हणाला की, नीट ची परीक्षा देण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे आणि यावर्षी आम्ही यश मिळवलेच. कोविड-19 लॉकडाऊनचा आम्ही पूर्ण फायदा घेत अभ्यास केला. या जुळ्या भावांचे वडील बशीर अहमद हे चौकीदाराचे काम करतात. त्यांनी सांगितले की, मी त्यांना फार मदत करु शकत नाही. पण तरीही पूर्णपणे प्रयत्न करतो. या दोन्ही मुलांनी नीटच्या परीक्षेत यश मिळवल्याचा मला अभिमान आहे. माझ्या मुलांचे यशा केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण काश्मीरसाठी अभिमानाचा क्षण आहे. (अमृतसर येथील Hissaa ने रचला इतिहास; International Space Olympiad 2020 मध्ये पटकावले प्रथम स्थान; NASA कडून भेटीसाठी आमंत्रण)
पहा फोटोज:
पहा व्हिडिओ:
शकीर याने सांगितले की, आमच्या यशाबद्दल कळताच मित्र, नातेवाईक आणि शेजारी अभिनंदन करण्यासाठी घरी आले. आमचे आई-वडील नेहमीच आम्हाला पाठींबा देतात आणि अभ्यासासाठी लागणारे सारे काही पुरवतात. दरम्यान, या जुळ्या भावांचा वडीलांसोबताच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत वडील मुलांना पेढा भरवताना दिसत आहेत. वडीलांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव कॅमेऱ्यातून सुटले नाहीत. नेटकरी देखील उज्ज्वल भविष्यासाठी या भावंडांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.