Tragic Wedding Incident in Kanpur: लग्नाच्या वरातीत घोड्याने लाथ मारल्याने मुलाचा मृत्यू; घटनेचा Video सोशल मीडियावर व्हायरल
कानपूर येथील हनुमंत विहार परिसरात लग्नाच्या उत्सवादरम्यान एका लहान मुलाचा घोड्याने लाथ मारल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Uttar Pradesh News: कानपूर (Kanpur News) येथे आयोजित एक विवाह सोहळा (Wedding Accident) एका अनपेक्षीत घटनेमुळे दु:खात परावर्तीत झाला. विवाहामध्ये वधू-वरांच्या वरातीसाठी आणलेल्या घोडीने लाथ मारल्याने एका लहान मुलाचा मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण लग्न समारंभास गालबोट लागले. ही घटना हनुमंत विहार पलीस स्टेशन हद्दीत शहरातील ठाकूर चौक परिसरात घलडी. घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद (Viral CCTV Footage) झाली असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेनंतर विवास्थळी सन्नाटा पसरला. सोशल मीडियावर या प्रकरणानंतर लहान मुलांची सुरक्षा आणि विवाहांमध्ये कारणाशिवाय केलेला जाणारा तामजाम यांवरुन टीका होऊ लागली आहे.
लग्न, घोडी आण मृत्यू
लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आणलेला घोडा (मादी) लग्नाच्या बँडने वाजवलेल्या संगीतावर नाचत होता. या वेळी घोडीचा डान्स पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. त्यातच सर्वांचे लक्ष बँड आणि घोड्याचा नाच याकडे लागले होते. दरम्यान, दोन लहान मुले घोड्याच्या पायाजवळ आजूबाजूला खेळत होती हे उपस्थितांच्या लक्षात आले नाही. दरम्यान, या दोन मुलांपैकी एक खेळता खेळता घोड्याच्या मागच्या पायाजवळ आला. तो इतका जवळ आला की, घोड्याने अचानक मारलेली लाथ त्याच्या वर्मी लागली आणि त्याला मुर्च्छा आली. ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. उपस्थितांनी या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
लग्न, घोडी आण मृत्यू
घोड्याने मुलाला लाथ मारल्यावर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. मुलाच्या मृत्यूचे वृत्त कळताच लग्नमंडपात सुरु असलेले नाचगाणे आणि उत्साहाचे वातावरण पूर्णपणे बदलले आणि मुलाच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु झाला. सांगितले जात आहे की, घडलेल्या घटनेचा मुलाच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ज्यामुळे हे कुटुंब असहाय अवस्थेत आहे.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
जवळच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लग्नाची मिरवणूक जोरात सुरू आहे, गावकरी उत्सवाचा आनंद घेत आहेत. काही क्षणांनंतर, दोन मुले खेळता खेळता घोड्याच्या मागे येतात. जिथे घोडा सदर मुलाला लात मारताना पाहायाला मिळतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वी ट्विटर) वर एका वापरकर्त्याने शेअर केलेल्या या फुटेजने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशा कार्यक्रमांदरम्यान सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करताना अनेक वापरकर्त्यांनी शोकाकुल कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
काळजी घेतली असती तर प्राण वाचले असते
लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
ही दुःखद घटना सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान, विशेषतः जेव्हा मुले उपस्थित असतात तेव्हा देखरेख आणि सुरक्षिततेचे महत्त्व स्पष्ट करते. अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षा उपाययोजना पाळल्या गेल्या होत्या की नाही याबाबत पोलीसांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. या घटनेमुळे स्थानिक समुदायाला धक्का बसला आहे आणि अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी शोकाकुल कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)