जन गन मन... गाऊन विद्यार्थ्यांनी भारताने अमेरिकेला Hydroxychloroquine च्या केलेल्या मदतीचे मानले आभार? जाणून घ्या Youtuber Rickshawali च्या व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओ मागचं सत्य!

पण ही या व्हायरल व्हिडिओ मागची खरी गोष्ट नाही.

Fake WhatsApp forward on American youth singing Jana Gana Mana for export of Hydroxychloroquine (Photo Credits: File Photo)

जगभरात सध्या अमेरिकेसोबत सारेच देश कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहेत. अद्याप कोरोना व्हायरसवर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने उपचारासाठी शक्य ती मदत आणि माहितीचं आदानप्रदान केलं जात आहे. अशामध्ये काही दिवसांपूर्वी भारताने अमेरिकेसह काही विकसित देशांना hydroxychloroquine चा पुरवठा केला. या मदतीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. पण त्यापाठोपाठ आता सोशल मीडीयामध्ये काही लोकं 'जन गन मन' गात आपले आभार मानत असल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल होत आहे. "हैड्रोक्लोरीन " या गोळ्या भारतातून अमेरिकेला दिल्या त्या मदतीचे आभार म्हणून अमेरिकेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भारताप्रति श्रध्दा म्हणून भारतीय राष्ट्रगीत म्हंटले , ते नक्की ऐका अभिमानाने ऊर भरून येईल , हा व्हिडिओ कृपया सर्वांना पाठवा " जयहिंद जय भारत " असे मेसेज फॉरवर्ड  केले जात आहेत. यावर विश्वास ठेवू नका.  दरम्यान व्हिडिओमध्येही  अमेरिकन तरूण मंडळी भारताचं राष्ट्रगीत गाऊन कोरोना व्हायरस संकटाच्या काळात hydroxychloroquine ची मदत केल्याबद्दल आभार मानत असल्याचं सांगितलं जात आहे. पण ही या व्हायरल व्हिडिओ मागची खरी गोष्ट नाही.

दरम्यान अनिषा दीक्षित (Anisha Dixit) जिची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Rickshawali आहे तिने हा मूळ व्हिडिओ 2017 साली शेअर केला होता. 71 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी तिने हा व्हिडिओ बनवून 'Americans Sing the Indian National Anthem for the First Time'या टायटलने प्रसिद्ध केला होता. आता कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत अमेरिकन तरूण मंडळी भारताचे आभार मानत असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियामध्ये पसरत असलेले खोट्या दाव्यांचे व्हिडिओ

Fake WhatsApp forward on American youth singing Jana Gana Mana for export of Hydroxychloroquine (Photo Credits: File Photo)

अमेरिकन 'जन गन मन' गात असलेला मूळ व्हिडीओ

Hydroxychloroquine ही हिवताप म्हणजेच मलेरियाच्या आजारात वापरली जाणारी ड्रग आहे. सध्या कोव्हिड 19 मध्ये काही प्रमाणात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. दरम्यान भारताकडून अमेरिकेला 35.82 लाख गोळ्यांचा साठा पाठवण्यात आला आहे. सध्या अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. सुमारे 10 लाखापेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे.