Man Put Hand In Crocodile Jaw: मगरीच्या जबड्यात हात टाकणे तरुणाला पडले महागात; स्टंट दाखवताना पुढे काय झालं? तुम्हीचं पाहा Viral Video
Man Put Hand In Crocodiles Jaw (PC - Instagram)

Man Put Hand In Crocodile Jaw: मगरीचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेकदा मगरी (Crocodile) लोकांवर हल्ला करताना दिसतात. असाच एक धोकादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ही मगर एका व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात गच्च धरताना दिसत आहे. यानंतर ही व्यक्ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते.

वास्तविक हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तलावाशेजारी एक माणूस मगरीसमोर बसलेला दिसतो. आश्चर्य म्हणजे त्या मगरीचा जबडा आधीच उघडा असतो. आधी हे संपूर्ण प्रकरण दिखावा असल्याचे जाणवते. (हेही वाचा -Crocodile Attack Man Viral Video: मगर पकडायला गेला, मगरमिठीत अडकला; थोडक्यात वाचला बापुडा (पाहा व्हिडिओ))

मात्र, ती व्यक्ती मगरीसमोर गेल्यावर आधी काठीने तिचा जबडा तपासतो. पण यानंतर तो मगरीच्या जबड्यात हात ठेवतो. सुरुवातीला मगर प्रतिक्रिया देत नाही, परंतु त्यानंतर काय होते ते व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा - Human vs Crocodile in Gujarat: चार तरूणांनी मगरीच्या जबड्यातून एका व्यक्तीला पुन्हा जिवंत आणलं; वडोदरा मधील थरारक घटना)

 

View this post on Instagram

 

A post shared by Earth Reels (@earth.reel)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धोकादायक मगरीने त्या माणसाचा हात पूर्णपणे जबड्यात पकडला. त्यानंतर या व्यक्तीने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. कसं तरी त्याला त्याचा हात सोडण्यात यश मिळाले. त्याच्या हातावर मगरीच्या चाव्यामुळे निघालेले रक्त स्पष्ट दिसत आहे. यानंतर ती व्यक्ती तेथून लगेच निघून गेली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.