IPL Auction 2025 Live

प्लास्टिकचा पाऊस पडतोय? वैज्ञानिकांनी केला धक्कादायक खुलासा

मात्र ही गोष्ट खरी असून युएस (US) मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही धक्कादायक बाद समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

तुम्ही कधी ऐकले आहे का प्लास्टिकचा पाऊस (Plastic Raining) पडल्याचे. मात्र ही गोष्ट खरी असून युएस (US) मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही धक्कादायक बाद समोर आली आहे. यामध्ये प्लास्टिकचा पाऊस पडत असल्याचे खरे असल्याचे सांगण्यात आले आहे. याबद्दल युएस मधील जियोलॉजिकल सर्वेक्षण आणि युएस इंटिरियर डिपार्टनेंटच्या काही वैज्ञानिकांनी याचा खुलासा केला आहे.

या वैज्ञानिक उघड्या डोळ्यांनी प्लास्टिक पाहू शकत नाही. मात्र मायक्रोस्कोप आणि डिजिटल कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी प्लास्टिकचा पाऊस पडत असल्याचे कण पाहिले आहेत. या सर्वेक्षणात 90 टक्के प्लास्टिकचे कण दिसून आले असून त्यामधील जास्तीत जास्त कण प्लास्टिक फायबरचे होते. तर समुद्रापासून 10400 फूट उंचीवर डोंगराळ भागातील सर्वेक्षणातसुद्दा प्लास्टिकचे कण मिळाले आहेत.(धक्कादायक! शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटातून निघाले तीन किलो लोखंड; सहा महिन्यांपासून खात होता नटबोल्ट्स, खिळे, चमचे आणि पिन्स)

मात्र आढळून आलेले प्लास्टिकचे कण कोठून आले आहेत हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्लास्टिकचा वाढता उपयोग ही एक गंभार समस्या बनली आहे. या सर्वेक्षणातून हवा, पाणी आणि मातीमधून प्रचंड प्रमाणात प्लास्टिक जमा झाले आहे. यापूर्वी सुद्धा वैज्ञानिकांनी प्लास्टिकचे सुक्ष्म कण आढळून आले आहेत. त्यावेळी दक्षिण फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कण खाली कोसळताना दिसून येत होते. तर अन्य एका सर्वेक्षणात प्रत्येक आठवड्याला लोक 5 ग्रॅम प्लास्टिक खात असल्याची ही बाब समोर आली होती.