Fact Check: 'प्रधानमंत्री जन सम्मान योजने' अंतर्गत सर्व खात्यात जमा होणार 90,000 रुपये? PIB ने केला व्हायरल मेसेजचा खुलासा
त्यातील सत्य जाणून न घेता चुकीचे, दिशाभूल करणारे मेसेज देखील प्रचंड व्हायरल होतात.
सध्याच्या काळात सोशल मीडियावर एखादी गोष्ट (फोटो, व्हिडिओ, मेसेज) व्हायरल होणे अगदी सामान्य झाले आहे. त्यातील सत्य जाणून न घेता चुकीचे, दिशाभूल करणारे मेसेज देखील प्रचंड व्हायरल होतात. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खरंतर एका युट्युब व्हिडिओद्वारे (Youtube Video) हा मेसेज सर्वत्र पसरवला जात आहे. या व्हिडिओत 'प्रधानमंत्री जन सम्मान योजने' (Pradhanmantri Jan Samman Yojana) अंतर्गत खात्यात 90,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमागील तथ्य पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) सांगितले आहे. पीआयबीने युट्युब व्हिडिओचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत ट्विटच्या माध्यमातून त्यामागील सत्यचा खुलासा केला आहे.
पीआयबी फॅट चेकने ट्विटमध्ये लिहिले, हा दावा खोटा असून अशा कोणत्याही प्रकारची योजना केंद्र सरकारकडून चालवण्यात आलेली नाही. त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकारचा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका किंवा तो मेसेज फॉरवर्डही करु नका. (Fact Check: केंद्र सरकार 15 ऑक्टोबर पासून शाळा-कॉलेज सुरु करणार नाही? PIB ने सांगितले व्हायरल पोस्ट मागील सत्य)
दावा: प्रधानमंत्री जन सम्मान योजने अंतर्गत सर्व खात्यात केंद्र सरकार 90,000 रुपये जमा करणार.
सत्य: हा मेसेज खोटा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही.
Fact Check by PIB:
दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक फेक मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. कोरोना व्हायरस संकट काळात अशा प्रकारच्या मेसेजेंना अधिकच उधाण आले. परंतु, आंधळेपणाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत असते. त्यामुळे फेक मेसेजला बळी पडू नका. सत्य जाणून घेतल्याशिवाय मेसेज फॉरवर्ड करु नका.