जंतुनाशक किंवा Powerful Light शरीरात इंजेक्ट केल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो? माशांमुळे कोविड 19 चा प्रसार होतो? WHO ने ट्विटच्या माध्यमातून सांगितले सत्य

आताही ट्रम्प यांचा दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे WHO ने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी ब्लीच (Bleach) आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl Alcohol)यांसारख्या क्लिनर इंजेक्शन चा वापर करण्याचा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसंच Bleach किंवा Isopropyl Alcohol शरीरात इंजेक्ट करु नये असे नागरिकांना सूचित केले आहे. कोरोना व्हायरस संकटकाळात अनेक गैरसमूजती दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनने ट्विटच्या माध्यमातून दूर केल्या आहेत. आताही ट्रम्प यांचा दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे WHO ने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. अनेक लोकांवर Bleach सारख्या जंतुनाशकांचा प्रयोग करण्यात आला. मात्र त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

म्हणूनच WHO ने ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, ब्लीच किंवा इतर जंतुनाशकं शरीरात इंजेक्ट केल्याने कोविड 19 पासून तुमचे संरक्षण होणार नाही. याउलट तुम्हाला घातक परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ब्लीच किंवा इतर जंतुनाशकांचा वापर तुमच्या शरीरासाठी करु नका. (आईसक्रीम आणि इतर थंड पदार्थांच्या सेवनाने कोविड 19 चा प्रसार होतो? PIB ने सांगितले मेसेज मागील सत्य)

WHO Tweet:

कोरोना व्हायरस सबंधित अजून एक अफवा अशी आहे की, कोविड 19 चा प्रसार घरातील माशांपासून होतो. जागतिक आरोग्य संघटनेने हा दावाही खोटा असल्याचे सांगत लोकांना जागरुक केले आहे. WHO ने ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, कोविड 19 चा प्रसार माशांपासून होतो याचा कोणताही पुरावा किंवा माहिती उपलब्ध नाही. कोरोना व्हायरसचा प्रसार हा कोविड 19 ची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकला, शिंक आणि बोलताना उडणाऱ्या शिंतोड्यातून होतो.

कोरोना व्हायरस अति उष्ण तापमानात नष्ट होतो असा एक गैरसमज अगदी सहज लोकांमध्ये पसरला आहे. सुर्यप्रकाश किंवा अति उष्ण तापमानात म्हणजेच 25 डिग्री सेल्सियस तापमानात राहिल्यास कोविड 19 पासून संरक्षण होते. हा एक गैरसमज असून किती उष्ण तापमानात कोविड 19 ची लागण होऊ शकते. तसेच उष्ण वातावरण असलेल्या देशांमध्येही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले असल्याचे WHO ने ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

WHO Tweet:

कोरोना व्हायरस संकट काळात अनेक फेक न्यूज, खोटी माहिती अगदी सहज पसरत आहे. त्यामुळे सोशल मीडिया माध्यमातून फिरणाऱ्या सगळ्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोरोना व्हायरस संबंधित लेटेस्ट verified updates साठी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला किंवा लेटेस्टली मराठी ला भेट द्या.