सोशल मीडीयावर ISRO संशोधकांना सलाम करण्यासाठी मीम्सचा पाऊस; सामान्यांपासून दिग्गजांकडून चांद्रयान 2 मोहिमेतील प्रयत्नांचं कौतुक!
चांद्रयान 2 हा इस्त्रोचा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नसला तरीही भारतीयांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रो संशोधक, शास्त्रज्ञ आणि त्यांच्या मेहनतीला सलाम केला आहे
चांद्रयान 2 हा इस्त्रोचा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नसला तरीही भारतीयांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रो संशोधक, शास्त्रज्ञ आणि त्यांच्या मेहनतीला सलाम केला आहे. चांद्रयान 2 चे लॅन्डर विक्रम आज (7 सप्टेंबर) मध्यरात्री 1.38 च्या सुमारास चंद्राच्या पार्श्वभूमीवर उतरणं अपेक्षित होतं. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किमी अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. यानंतर सार्यांच्याच हिरमोड झाला मात्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधताना इस्त्रो संशोधकांनी हार न मानण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर अनेकांनी इस्त्रोचं कौतुक करणारे ट्वीट्स केले आहेत. यामध्ये सामान्यांपासून अगदी राजकारणी ते सेलिब्रिटी यांचा समावेश आहे. ISRO च्या चांद्रयान 2 मोहिमेच्या प्रयत्नांच्या पाठीशी भारतीय; लालबागचा राजा गणेशमंडळाकडूनही देखाव्यामध्ये बदल करत अभिमानास्पद कामगिरीचं कौतुक
वीरेंद्र सेहवाग
गौतम गंभीर
खास मीम्स
चांद्रयान 2 चंद्रावर उतरू शकले नसले तरीही शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षभर अभ्यास सुरू राहणार आहे. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाली असती तर भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरला असता.