IPL Auction 2025 Live

लंडन येथे राष्ट्रध्वजाचा अपमान करत अससेल्या पाकिस्तानी समर्थकांना भारताची पत्रकार पूनम जोशी ने दिले असे उत्तर, पहा व्हिडिओ

मात्र लंडन येथे भारताच्या राष्ट्रध्वजाचा (Indian Flag) अपमान पाकिस्तानी (Pakistani) समर्थकांकडून केला जात होता. त्यावेळी भारतीय पत्रकार पूनम जोशी (Poonam Joshi) हिने यावर विरोध दर्शवत त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

भारतीय पत्रकार पूनम जोशी (Photo Credits-ANI)

राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र लंडन (London) येथे भारताच्या राष्ट्रध्वजाचा (Indian Flag) अपमान पाकिस्तानी (Pakistani) समर्थकांकडून केला जात होता. त्यावेळी भारतीय पत्रकार पूनम जोशी (Poonam Joshi) हिने यावर विरोध दर्शवत त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पूनम हिने पाकिस्तानी समर्थकांना दिलेल्या उत्तरामुळे तिचे सोशल मीडियात कौतुक केले जात आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या वेळी पूनम जोशी ही लंडन येथे रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी काही पाकिस्तानी समर्थक भारताबद्दल संताप व्यक्त करत राष्ट्रध्वजाचा अपमान करत होती. परंतु पूनम हिने हा प्रकार पाहिला असता चाललेला प्रकाराचा तिने एकटीने गर्दीत जात याचा विरोध केला.

येथे पहा व्हिडिओ:

जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकला. यामुळे लंडन मध्ये भारतीय दूतवासाच्या येथे पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थक या निर्णयाचा विरोध करताना दिसून आले. त्यावेळी भारताचा राष्ट्रध्वज जमिनीवर फेकच त्याचा अपमान करत होते. पण पूनम हिने या प्रकाराव संताप व्यक्त करत समर्थकांच्या हातामधून झेंडा खेचून घेतला.(प्रयागराज: वर्दीवर असलेल्या दोन पोलिसांमध्ये लाच घेण्यावरुन हाणामारी; सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारची आहे. पूनमने समर्थकांना हा प्रकार करताना थांबत असताना तेथे पोलिस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. मोठ्या संख्येने येथे गर्दी झाली होती मात्र हा प्रकार थांबवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आले आहे.